भांबुर्डी ग्रामपंचायत व आर्ट ऑफ लिविंग च्या संयुक्त विद्यमाने 30 बेडचे श्री श्री कोवीड सेंटरचा शुभारंभ.

माजी आमदार रामहरी रुपनवर राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर आर्ट ऑफ लिविंग चे सुहास माने व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ.


भांबुर्डी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी ग्रामपंचायत व आर्ट ऑफ लिविंग च्या सहकार्यातून 30 बीडचे श्री श्री कोविड सेंटरचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी चांदापुरी कारखान्याचे माजी चेअरमन व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर आर्ट ऑफ लिविंगचे सुहास माने, सोमनाथ वाघमोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, भांबुर्डी च्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ स्वातीताई दादासाहेब वाघमोडे, ज्येष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, शिवाजीराव शिंदे, ग्रामपंचायतचे मार्गदर्शक दादासाहेब वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव वाघमोडे संजय बंडगर संतोष वाघमोडे बापूराव नरळे शंकरराव वाघमोडे केशव वाघमोडे दिनेश जावीर,डॉक्टर गणेश वाघमोडे डॉक्टर नितीन वाघमोडे डॉक्टर महादेव वाघमोडे डॉक्टर मोहन वाघमोडे डॉक्टर दिलीप वाघमोडे डॉक्टर निवास गांधी डॉक्टर ऋषिकेश वाघमोडे डॉक्टर सुनील लोंढे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सचिन उदाळे,तलाठी अमोल चव्हाण ग्रामसेविका भाकर मॅडम आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य व समस्त भांबुर्डी ग्रामस्थासह आर्ट ऑफ लिविंग परिवारातील सदस्य उपस्थित होते.


माळशिरस तालुक्यांमध्ये अनेक ग्रामपंचायत यांनी कोवीड सेंटर सुरू केलेली आहेत मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव भांबुर्डी येथील 30 बेडचे आर्ट ऑफ लिविंग च्या सहकार्याने श्री श्री कोवीड सेंटर पहिले आहे त्यामुळे भांबुर्डी परिसरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असून सदर ठिकाणी उपचार घेणे सोयीचे होणार आहे. भांबुर्डी ग्रामपंचायत चे मार्गदर्शक दादासाहेब वाघमोडे व आर्ट ऑफ लिविंग चे सुहास माने यांनी अथक परिश्रम घेऊन श्री श्री कोवीड सेंटर उभे केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here