खुडूसच्या सरगरांनी परदेशात आंब्याचे नाव केले : मदनसिंह मोहिते पाटील

खुडूस (बारामती झटका) : खुडूस ता. माळशिरस येथील सरगर परिवाराने शेती मध्ये कष्ट करून उत्कृष्ठ नियोजन करून शेतीमध्ये प्रगती तर केलेलीच आहे परंतु डॉ. सरगर नर्सरीच्या माध्यमातून कलमे रोपे उत्पादन व वितरण करून अनेकांना आंबा बागायतदार करून स्वतःच्या बागेतील आंबेसुद्धा बाहेरच्या देशात पाठवून सरगर परिवाराने परदेशातही केशर नर्सरी आंब्याचा नावलौकिक केलेला असल्याचे मत अकलूज कृषी उत्पन्न समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले .
खुडूस येथे राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे अवचीत्य साधून संयोजक बाळासाहेब वावरे यांनी जयंतीनिमित्त राज्य शासनाचा कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मकरंद सरगर यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्या कार्यक्रमात मदनसिंह मोहिते पाटील बोलत होते त्यावेळी व्यासपीठावर माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील , उपसभापती किशोरराजे सुळ पाटील,कर्तव्यदक्ष पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, भाजपाचे ओबीशी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वावरे, तालुका अध्यक्ष सोपानराव नारनवर, माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, जि.प सदस्य बाळासाहेब धाईजे,अरूण तोडकर, अल्पसंख्यांक चे जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबू , खुडूसच्या सरपंच वंदना सरगर, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा नंदिनी चौगुले, रुपाली निंबाळकर, पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील,अॅड हसिना शेख, राहूल वाघमोडे, मनसेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, कारखान्याचे संचालक नामदेव ठवरे, केशव ठवरे, विकास धाईजे, मिलिंद सरतापे बाबुराव खिलारे सुभाष गोसावी श्रीनिवास कदम पाटील डॉ केशव सरगर जगन्नाथ घोगरे डोंबाळवाडीचे सरपंच पिनू माने झंजेवाडीचे सरपंच अर्जुन सरगर मोहन झंजे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कृषिभूषण मकरंद सरगर यांनी माझा सत्कार माझ्या जन्मगावी झाल्यामुळे मला जेवढा कृषिभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर जेवढा आनंद झालेला होता त्याही पेक्षा जास्त आनंद झालेला आहे. गावामध्ये मानसन्मानाने सत्कार केला त्याबद्दल राजमाता आहिल्यादेवी जयंती समारंभ समितीचा कायम स्वरूपी ऋणी राहणार असल्याची भावना सत्कारमूर्ती मकरंद सरगर यांनी बारामती झटक्याशी बोलताना व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब कर्चे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड सिताराम झंजे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड सिताराम झंजे सदाशिव ठवरे प्रा विनायक ठवरे अॅड धनाजी ठवरे अज्ञान गोरड विठ्ठल शिंदे संभाजी ठवरे डॉ केशव सरगर विठ्ठल डोंबाळे चंद्रकांत शिंदे अंकुश ठवरे यांनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here