मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्यांना प्रत्येकी १० लाख व एकाला नोकरी देण्याचा कॅबिनेटमध्ये ठराव

करमाळा (बारामती झटका)
करमाळा तालुक्यातील मराठा समाजाचे नेते महेश डोंगरे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी आर्थिक मदत करावी, असे निवेदन दिले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेचच बलिदान दिलेल्या मराठा बांधवांना प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मदत व एकाला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. त्यावर तात्काळ त्याची अंमलबजावणी करा असे आदेश दिले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांनी १२ तारखेला हे निवेदन दिले होते. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना हे निवेदन देण्यात आले होते. अनिल परब यांनी तात्काळ एसटी महामंडळाची बैठक लावली आहे. त्या बैठकीमध्ये त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. 12 ऑगस्ट रोजी कॅबिनेटमध्ये ठराव झालेला आहे. त्याप्रमाणे मराठा आरक्षण दरम्यान शहीद झालेल्या कुटुंबातील प्रत्येकाला नोकरीवरती घेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे मराठा ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे व मराठा समाजाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here