लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला पेट्रोल मालकासह कर्मचारयांची आरेरावी हिन वागणूक

चडया दराने माळशिरस मधील दोन्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्री.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी माळशिरस मधील पेट्रोल पंपावर गुन्हे दाखल करण्याची नांगरीकांतुन मांगणी केली जात आहे.

माळशिरस (बारामती झटका)

जगाबरोबर देशात आणि राज्यात कोरोणाचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर संकटांचा सामना करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च च्या मध्यरात्रीपासून 21 दिवसांचा लाॅक डाऊनलोड करण्याचे आव्हान केले. दरम्यान सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम 144 आणि संचारबंदी लागू केली आहे त्यातच महाराष्ट्रात कोरोनो रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीदेखील स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणती पर्वा न करता संबंधीची प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट जनतेपर्यंत प्रशासनापर्यंत पत्रकार पोहोचवत आहे. पुणे मुंबई किंवा बाहेरगावावरून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम ते करीत आहेत. जसे स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात पत्रकारांचे योगदान नाकारता येत नाही तसेच सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत देखील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांना सध्या पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यास नकार. ही खूप मोठी शोकांतिका असून त्यांनाच उलट अरे रवी ची भाषा वापरली जात आहे. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. विनंती करून देखील पेट्रोल दिले जात नाही.पेट्रोल मालक व कर्मचारी हे पञकारांनाच आरेरावीची भाषा करत आहेत.माळशिरस मधील दोन्ही पेट्रोल पंपावर ओळखीच्या नागरीकांना चडया दराने पेट्रोल विक्री करीत आहेत. त्यामुळे पत्रकारातुन तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.खास बाब ही की सोलापूर जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अत्यावश्यक सेवा प्रमाणेच पत्रकारांनाही त्यांचे ओळखपञ बघून  पेट्रोल द्यावे असे आदेश दिले असताना देखील पेट्रोल नाकारलं जातंय.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here