अकलूजचे मंडलाधिकारी हरिभाऊ चांडोले यांचा प्रांतअधिकारी शमा पवार यांच्या हस्ते सन्मान

मंडलाधिकारी हरिभाऊ चांडोले यांचा बदलीनिमित्त सन्मान करताना प्रांतअधिकारी शमा पवार, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक निनाद पाटील, मुबारक कोरबू तसेच महसूल विभागाचे एस. एस. घाडगे, सुषमा निकम, नवनाथ मोरे, अमोल कांबळे, अमोल गेजगे, विलास रणसुभे, अजित जाधव आदी मान्यवर.

अकलूज (बारामती झटका)

अकलूज महसूल विभागाचे मंडल अधिकारी हरिभाऊ चांडोले यांचा अकलूज येथील मंडल अधिकारी म्हणून कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली पंढरपूर येथील प्रांत कार्यालयात झाली असून बदलीनिमित्त त्यांचा सन्मान अकलूजच्या प्रांतअधिकारी मा. शमा पवार (मॅडम) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक निनाद पाटील, मुबारक कोरबू तसेच महसूल विभागाचे एस. एस. घाडगे, सुषमा निकम, नवनाथ मोरे, अमोल कांबळे, अमोल गेजगे, विलास रणसुभे, अजित जाधव आदी महसूल विभागातील सहकारी उपस्थित होते.  

       हरिभाऊ चांडोले यांची १९९२ साली रेकॉर्ड रूममध्ये कॅंडिडेट म्हणून कामाला सुरुवात झाली होती. यानंतर २००७ साली पंढरपूरच्या तहसील कार्यालयात लिपिक पदाचा कार्यभार घेतला. यानंतर त्यांनी खात्यांतर्गत परीक्षा देऊन २०१२ साली  सांगोला मंडल अधिकारी म्हणून कामकाज सुरू केले. यानंतर प्रशासकीय बदलीनुसार २०१५ साली अकलूज येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यभार घेऊन सलग चार वर्षे अकलूज येथे कामकाज केले. आणि सध्या पंढरपूर येथे प्रशासकीय नियमानुसार त्यांची बदली झालेली आहे.

मूळचे पाचेगाव खुर्द ता. सांगोला जि. सोलापूर येथील रहिवासी असलेले हरीभाऊ चांडोले यांना २०१० साली कार्यालयीन कामकाजात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी मा. जगदीश पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले असून २०१५ साली संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनामध्ये अकलूज येथे महत्वपूर्ण कामकाज केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी मा. तुकाराम मुंडे यांनीही हरिभाऊ चांडोले यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here