अकलूज सांगोला रोडच्या खड्ड्यांपेक्षा भरलेल्याचा ज्यादा त्रास

अकलूज (बारामती झटका)

सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज अंतर्गत असलेला इंदापूर-अकलूज-सांगोला रोड या रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडून या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागलेला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. जनतेतून व माध्यमातून याचा तीव्र निषेध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले आणि झोपेतून उठल्यासारखे खड्डे मुरुमाने भरून वाहनधारकांना अजूनच त्रासाचे केल्यामुळे चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे खड्डे पडलेले असल्यापेक्षा भरलेल्याचा ज्यादा त्रास वाहनधारकांना होऊ लागलेला आहे.

अकलूज सांगोला रोड हा नेहमी वर्दळीचा रस्ता आहे. याच रस्त्यावरून पंढरपूरकडे जाणारे सर्व लोक इंदापूर मार्गे देहू, आळंदी, पुणे या परिसरातून येत असतात. अकलूजच्या बाजारपेठेमध्ये अनेक गावचे लोक या रस्त्याने येत असतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली शासनाचा निधी म्हणून मिळालेल्या कोट्यावधी रुपयाची धूळधाण केलेली आहे. या रस्त्यावरील साईट गटर, साईट पट्ट्या यांची नेहमीच ओरड असते. अनेक ठिकाणी गटरी व्यवस्थित न केल्याने गटरीतून पाणी वाहण्याऐवजी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. साईडची झाडे-झुडपे एवढी वाढलेली आहेत कि, रस्ता सोडून साईड पट्टीवर दुसरे वाहन जाऊ शकत नाही. ही अशी बिकट दैन्यावस्था या रस्त्याची आहे. सध्या मुरमाने भरलेल्या खड्ड्यांमुळे मुरमातील खडे खड्ड्याच्या बाजूला चांगल्या रस्त्यावर पडलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे चुकवावे का ? खड्डे चुकवावे असा प्रश्न पडत असताना पाठीमागून आणि समोरून येणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अकलूज-सांगोला रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या रस्त्यावर आज पर्यंत कोणत्या ठेकेदारांनी कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला. कोणत्या अधिकार्‍याने तो खर्च केला याची सर्व चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here