अखिल भारतीय शुटींग बॉल सामन्यातील विजेत्या संघांना बक्षीस वितरण.

माळशिरस ( बारामती झटका )

नुकत्त्यतेच   कै.रामचंद्र बाबासाहेब देशमुख ग्रामविकास प्रतिष्ठान व कै. बापूराव बाबासो देशमुख संचलित व कै.पैलवान ज्ञानदेव गोपाळ देशमुख यांचे स्मरणार्थ नवयुग क्रीडा मंडळाने आयोजीत केलेल्या  अखिल भारतीय हॉलीबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अंतिम लढती नंतर आय एस सी मालेगाव प्रथम क्रमांक, संजय भोसले प्रतिष्ठान द्वितीय क्रमांक ,इस्तियाक मालेगाव तृतीय क्रमांक , तर उत्तर प्रदेश पप्पू चतुर्थ क्रमांक मिळवून विजय ते ठरले  या स्पर्धेत एकूण ३०संघांनी सहभाग नोंदविला होता यातील आठ संघांना बक्षीस देण्यात आले या वेळी उद्योजक रामभाऊ जगदाळे , सरपंच जीवन जानकर ,श्रीराज माने पाटील, मच्छिंद्र ठवरे सुरेश पालवे जिल्हा हॉलीबॉल असो चे अध्यक्ष नंदकुमार  गांधी ,मंडळाचे अध्यक्ष तुकाराम देशमुख, नाना काळे, आशोक देशमुख , आनिल सावंत , प्रमोद दोशी , किरण सावंत विपीन ननवरे देवीदास ढोपे. टि डी देशमुख सचिन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते

                        गेल्या २९ वर्षापासुन नवयुग क्रीडा मंडळ क्रिकेट , कुस्ती , सह संस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातुन वेगवेगळे कार्यक्रम राबवात आहे. यंदा प्रथमच भारतीय शुटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते  .  नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय हॉलीबॉल सामन्या साठी पांडुरंग वाघमोडे ,डॉ प्रवीण पाटील ,अनंत खंडागळे शिवतेजसिंह मोहिते-पाटील, युवराज झंजे , संन्मती हॉस्पिटल , समाधान भोसले, बाबूलाल शेख आदींनी आठ संघाना प्रत्येकी बक्षीस दिले. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय हॉलीबॉल संघातील अस्लम मुजावर बिपिन ननावरे जयंत खंडागळे इस्तियाक शोएब सुधाकर या खेळाडूंनी या सामन्यांमध्ये सहभाग नोंदविला यामध्ये या सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून मालेगाव येथील वखार याला देण्यात आला तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून अस्लम मुजावर याला बहुमान देण्यात आला या खेळात पंच म्हणून नंदू भोईटे विजय कोकीळ जावेद मनोरे अरविंद पाटील यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे समालोचन अमर शेख व आरिफ काझी यांनी केले तर आभार नगरसेवक मारुती देशमुख यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here