आंतरजिल्हा बदली रॅण्डमग्रस्त शिक्षकांना न्याय द्या. जि.प. अध्यक्षांकडे मागणी

शिक्षक सहकार संघटनेची मागणी

सोलापूर (बारामती झटका)

आंतरजिल्हाबदलीने सोलापूर जिल्ह्यात २०१८/२०१९ रोजी रूजु झालेल्या रॅण्डमग्रस्त शिक्षकांनी शिक्षक सहकार संघटना शाखा सोलापूर चे जिल्हाध्यक्ष श्री.रविराज खडाखडे यांच्या नेतृत्वात आज सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री. अनिरूध्द कांबळे साहेबांची दालनात भेट घेऊन रॅण्डमग्रस्त शिक्षकांनी त्यांना मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली.

पुढे रॅण्डमग्रस्त बांधवांनी आपल्या समस्या मांडल्या, आम्ही सर्वांनी इतर जिल्ह्यांमध्ये गेली पंधरा वर्षे सेवा केलेली आहे व आंतरजिल्हा बदली शासन निर्णयाप्रमाणे मुळातच कुटुंबाच्या जवळ राहता यावे यासाठी बदली केली पण पदस्थापना ह्या स्वत:च्या मुळ तालुक्यात न मिळता त्या इतर तालुक्यात मिळालेल्या आहेत.आम्ही आता घरापासून १२०/१५० किमी एवढ्या अंतरावर अध्यापनाचे काम करतो,मुळात आंतरजिल्हा बदली ही कुटुंबाजवळ जाणे अभिप्रेत असताना प्रशासनाने आम्हाला परत एकदा कुटुंबापासून दूर ठेवले आहे.साहेब ह्यावेळेस आम्हाला स्वतालुक्यात पदस्थापना द्यावी अशी न्याय मागणी बांधवांनी केली.

आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांचे समुपदेशन करताना रॅण्डम राऊण्ड मधिल शिक्षकांचे समुपदेशन घेण्याची संदर्भात ग्रामविकास विभागाने २८ जून, २०१८ व २८ मे, २०१९ हे पञ काढलेले असून त्या पञानुसार रॅण्डमग्रस्त शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती पुणे विभागाचे सचिव श्री.दिपक परचंडे यांनी साहेबांकडे केली. सोबतच समुपदेशन ही प्रक्रिया राबवताना समानिकरणात असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी,जिल्ह्यातील तालुकानिहाय निव्वळ रिक्त पदांची यादी जाहिर करण्यात यावी, सध्या कोविड-१९ परिस्थितीमुळे आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या काही शिक्षकांचे समुपदेशन न करता सर्व शिक्षक हजर झाल्यानंतर समुपदेशन करण्यात यावे, ह्या मागण्या निवेदनाद्वारे साहेबांकडे केल्या आहेत.

चर्चेदरम्यान अध्यक्ष साहेबांनी सर्व बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व तुम्हा सर्वांना नक्की न्याय मिळेल,असा धीर उपस्थित असलेल्या बांधवांना दिला.यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष श्री.सचिन निरगिडे,मंगळवेढा तालुका अध्यक्ष विजय बबलेश्वर, राजकुमार कोळी,श्रीमंत कोळी,सोमलिंग बिराजदार,सिध्दाराम कोळी,श्रीकृष्ण शेतसंधी,रविंद्र जेटगी,मुश्रीफ शेख,नागनाथ बिराजदार,सत्यनारायण नडीमेटला,सुनिल पवार, लक्ष्मण राठोड,कृष्णा बेळ्ळे,राजू राठोड, व इतर रॅण्डमग्रस्त शिक्षक बांधव संख्येने आपल्या व्यथा मांडण्यासाठी हजर होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here