आदर्श ग्रामपंचायत विंचुर्णी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

ॲड सौ. जिजामाला नाईक निंबाळकर वहिनीसाहेब व फलटणचे तहसीलदार समीर यादव साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

फलटण ( बारामती झटका )


आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदर्श ग्रामपंचायत विंचुर्णी येथे गिरवी जि.प सदस्या ॲड सौ जिजामाला नाईक निंबाळकर वहिनीसाहेब व फलटणचे तहसीलदार समीर यादव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व विंचुर्णी चे मा अदर्श सरपंच सुशांत भैय्या निंबाळकर तसेच सातारा जिल्हा आदर्श महिला सरपंच सौ अस्मिता निंबाळकर , आदर्श गाव विंचुर्णीच्या विद्यमान सरपंच सौ राणी ताई चव्हाण , उपसरपंच सौ पुनम ताई इतापे ,सदस्या सौ वैशाली ताई चव्हाण, ग्रामसेवक भरत आन्ना भोसले , विंचुर्णी विकास सोसायटीचे व्हाइस चेअरमन श्री माऊली काका निंबाळकर मा सरपंच प्रल्हाद अहिवळे ,मा उपसरपंच जयराम चव्हाण ,पंढरी तात्या इतापे ,मानसिंग मामा इतापे ,सदाभाऊ निंबाळकर ,अंकूशआन्ना नलवडे , बापु चव्हाण , संदिप अहिवळे ,दिलीप मामा घाडगे ,लखन चव्हाण ,बाळू मामा इतापे ,गजाभाऊ भोईटे, हणमंत आण्णा गायकवाड ,रघूआप्पा चव्हाण,अनिकेत नलवडे, नितीन गायकवाड,मिनीनाथ जाधव, रणजितनाना निंबाळकर, दिपक निंबाळकर, अभिजीत सस्ते, जयदीप निंबाळकर, सुरज नलवडे, नवनाथ लकडे,बिनू चव्हाण, राजेंद्र गायकवाड,सर्व अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी , राहूल पिसाळ ,बापू सोनवलकर,प्रज्वल पाटणकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.आज जागतिक पर्यावरण दिवस.


कोरोनाच्या संकटकाळात निसर्ग आपल्याला संदेश देतोय, “स्वतःची काळजी घेण्यासाठी.आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे.”


पर्यावरणाशी संबंधित विविध विषय आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल प्रबोधन करणे. नव्या पिढीला पर्यावरणविषयक महत्त्व सांगून पर्यावरण गुणवत्ता वाढीसाठी पावले उचलणे.पर्यावरण समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे असा मुख्य हेतु हा दिवस साजरा करण्यामागे आहे.


‘पर्यावरणाची होणारी हानी रोखुन, पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे’ (Ecosystem Restoration)ही या वर्षीची थीम आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपण सर्वजण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करुया. आपले नम्र – स्व कृषीरत्न बि.के.भाऊ निंबाळकर ग्रामविकास आघाडी.ग्रामपंचायत विंचुर्णी.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here