उत्तमराव जानकर गटाचा गुरुवारी वेळापूर येथे मेळावा

वेळापूर (बारामती झटका)
चांदापूरी कारखान्याचे चेअरमन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती भाजप नेते उत्तमराव जानकर यांच्या गटाचा गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वा. कार्यकर्त्यांचा मेळावा गरुड बंगला येथे आयोजित केलेला आहे.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळणारा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिल्याने उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. त्यांच्या समर्थकांतून उत्तमराव जानकर यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देण्यात यावी यासाठीचा आग्रह चालू आहे. सध्या मोहिते पाटील आणि विरोधक हे भारतीय जनता पार्टीमध्ये असल्याने कोणत्या गटाला भाजप आमदारकीची संधी देईल असे असताना उत्तमराव जानकर गटाचा गुरुवारचा मेळावा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
सध्या मोहिते पाटील गटाच्या उमेदवाराला भाजपचे तिकीट मिळालेले आहे, अशा वावड्या उडालेल्या असल्याने उत्तमराव जानकर समर्थकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून उत्तमराव जानकर आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांना अजूनही आशा आहे भारतीय जनता पार्टी माळशिरस विधानसभेसाठी उमेदवारी देतील. जर दिली नाही तर कार्यकर्त्यांच्या समवेत निर्णय घेऊन माळशिरस तालुक्याची दिशा ठरणार आहे. अजून कोणत्याच राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार घोषित होऊन नामनिर्देशनपत्र भरलेले नाही. त्यामुळे गुरुवारच्या मेळाव्याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. भाजपने जर उमेदवारी दिली नाही तर उत्तमराव जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभे राहण्याचा आग्रह करणार असल्याचे जानकर समर्थकांतून बोलले जात आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत कोणताच निर्णय नसल्याने गुरुवारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

माळशिरस तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य दूध संस्था मजूर संस्था सेवा सोसायटी यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विविध गावचे प्रमुख नेतेमंडळी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here