कण्हेरच्या भूमिपुत्राने भांब गावात घराण्याचे व गावाचे नाव उज्वल केले.

ग्रामीण भागातील रांगडे व्यक्तिमत्व भांबचे सरपंच पोपटतात्या सरगर यांनी यशस्वी वयाचे अर्धशतक पूर्ण केले.

माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांचे विश्वासू सहकारी यांपैकी एक सहकारी पोपटराव सरगर

भांब ( बारामती झटका )


भांब गावचे विद्यमान सरपंच पोपटराव सरगर यांनी वयाचे यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. मुळगाव कण्हेर सरगरवाडी असूनसुद्धा भांब गावामध्ये जाऊन ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व असणाऱ्या तात्यांनी घराण्याच्या नावासह गावाचे नाव उज्वल केलेले आहे. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांचे ते विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अशा कर्तुत्ववान सरपंच पदावर असणारे पोपटराव सरगर ऊर्फ तात्या यांचा तरुण पिढीने आदर्श घ्यावा असा जीवनपट आहे.
पोपटराव सरगर यांचे मुळगाव कण्हेर सरगरवाडी आहे. त्यांचा जन्म भांब येथील मामाच्या गावी आजोळी दि. 2 जून 1970 साली झालेला होता. त्यामुळे मामाच्या गावामध्ये लहानपणापासून वाढलेले असल्याने त्यांचे शिक्षण सुद्धा मामाच्या गावाला भांब येथे झालेले आहे. त्यांची भांब ही जन्मभूमी आणि कर्मभूमी ठरलेली आहे. भांब गावातील सिद परिवार यांच्या घराण्याकडे राजकीय वारसा होता. आजोबा कै. ढाकु मामा सिद हे वीस वर्ष गावचे सरपंच होते, त्यामुळे गावगाड्यातील राजकारण तात्यांना जवळून पाहता आले. लहानपणीच राजकारणाचे बाळकडू त्यांना आजोळीच मिळाले. तात्यांचा मनमिळावू स्वभाव, सोज्वळ व्यक्तिमत्व, साधासरळ माणूस मात्र, महत्वकांशी असल्याने कार्याच्या जोरावर अष्टपैलू नेतृत्व ठरले. लहानपणापासून तालिमीची आवड होती. त्यामधून अनेक सवंगडी साथीला घेऊन त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या खडतर जीवनाला सुरुवात केलेली होती. घरची परिस्थिती बेताचीच होती. मात्र, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द होती, कष्ट करण्याची अंगामध्ये ताकत होती. त्यांनी सुरुवातीला भांब गावामध्ये किराणा दुकान सुरू केले. त्यामध्ये आपला चांगला जम बसवून त्यांनी किराणा दुकान यशस्वी चालू करून त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नामधून सुरुवातीस ट्रॅक्टर, अवजारे घेऊन त्यांनी उत्कृष्ट शेती करून ट्रॅक्टरच्या मेहनतीवर त्या परिसरामध्ये आपले उत्पन्न वाढवून जमीन खरेदी केली. त्यांनी त्याकाळी दूध डेअरी सुरू केली आणि त्यामधूनच अनेकांचा जनसंपर्क वाढला. आपली घरची परिस्थिती सुधारत असताना त्यांनी भांब गावांमध्ये किराणा दुकान, ट्रॅक्टर, शेती, तालीम, दूध व्यवसाय यामधून अनेक मित्र व सहकारी यांना वेळोवेळी मदत व सहकार्यही केलेले होते. मेंढपाळ लोकांनाही त्यांनी सहकार्य करून त्यांच्यामध्येही संघटन निर्माण केलेले होते. आजोळी राजकारणाचे बाळकडू मिळालेले होते, त्यामुळे आता त्यांनी पहिल्यांदा ग्रामपंचायत मध्ये 2000 साली पहिल्यांदा पॅनल उभा केला आणि गावातील लोकांनी भरघोस मतांनी पॅनलला निवडून देऊन विश्वास दाखवलेला होता. तात्यांनी त्या काळामध्ये भविष्याचं राजकारण ओळखून मनाचा मोठेपणा दाखवून स्वतः उपसरपंच पद स्वीकारले आणि दुसऱ्याला सरपंच पद बहाल केले. यामध्येच त्यांनी गावातील लोकांची मनं जिंकली. सर्व जाती धर्मातील व गोरगरीब जनतेची कामे तात्यांनी करून मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या. सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तात्यांनी यशस्वीरित्या सक्षमपणे रात्रंदिवस काम केले. पंचवीस वर्ष सतत ग्रामपंचायतच्या माध्यमातून तात्यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा केली होती. तात्यांना भांब गावचे लोकांना सरपंच पदावर विराजमान होताना पहावयाचे होते. यासाठी अटीतटीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक दोन मधून बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झाले. सर्व मित्र परिवार, कामाच्या जोरावर, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यामुळे भांब गावचे सरपंच होण्याचा बहुमान तात्यांना मिळाला. सरपंच झाल्यानंतर तात्यांनी गावांमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये अतिशय चांगले काम करून गावातील लोकांना कोरोना विषारी विषाणूच्या संसर्ग रोगापासून धोका निर्माण होऊ नये यासाठी तात्या स्वतः गावांमध्ये ट्रॅक्टरने सॅनिटायझरची फवारणी करून गाव निर्जंतुक करीत होते. गावामधील व गावातील बाहेरगावी असणाऱ्या लोकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तात्या सहकार्य करीत होते. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जवळची चांगली चांगली माणसं सोडून गेलेली आहेत. त्यामुळे पोपटराव सरगर यांनी आपल्या वयाची यशस्वी 50 वर्ष पूर्ण करून एक्कावन वर्षात पदार्पण केलेले असले तरीसुद्धा त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. सध्याची परिस्थिती गंभीर व कठीण आहे. कोरोनाच्या महामारीमुळे कोणालाही बाधा होऊ नये, यासाठी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याची भूमिका घेतली आहे व सर्व जनतेला त्यांनी संदेश दिलेला आहे, सुरक्षित रहा, कुटुंबाची व आपली स्वतःची काळजी घ्या. आणि आपलं गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून कोरोनाला हद्दपार करूया. याच खऱ्या अर्थाने माझ्या एक्कावणव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा राहतील, अशी त्यांची भावना आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here