काकासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

माढ्याचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांचे विश्वासू सहकारी काकासाहेब पाटील
टाकळी टें. ( बारामती झटका )

दि. 2 जून रोजी श्री. काकासाहेब शिवाजी पाटील रा. टाकळी (टे.) ता. माढा यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यांचे सामाजिक व राजकीय काम मोठ्या प्रमाणावर असून ते पंचायत समिती सभापती विक्रमदादा बबनराव शिंदे यांचे जिवलग व विश्वासू कार्यकर्ते आहेत. काकासाहेब हे ओबीसी संघटन मजबूत करण्यात यशस्वी आहेत. काकासाहेब पाटील यांनी या अगोदर वेगवेगळी राष्ट्रवादीत पदे जबाबदारीने पार पाडली आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत विविध जबाबदाऱ्या पार करून आता त्यांची फेर निवड केली. त्यांचे मार्गदर्शक आमदार बबनराव शिंदे, जिल्ह्याचे नेते आमदार संजयमामा शिंदे, जि. प. सदस्य भावी आमदार रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमदादा शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माढा तालुक्याच्या राजकारणात युवकांची मोठी फौज व ओबीसी समाज एकत्र करण्यास काकासाहेब पाटील सक्षम आहेत, म्हणून त्यांची फेरनिवड केली. काकासाहेब हे ग्रामीण भागातील गरजा व समस्या सोडवण्यात व्यस्त असतात. त्यांना लहान वयातच समाजकारणाची गोडी होती. ती पुढे जोपासता त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण करून आता ते राजकारणात सक्रीय झाले असून ते राष्ट्रवादी पक्षाचे चांगले विचार तळागाळात पोहचवण्यात यशस्वी झाले आहेत. या निवडीने माढा तालुक्याच्या कोंढारभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


त्यांना सोशल मिडीयावर व प्रत्यक्ष भेटून लोक शुभेच्छा देत आहेत. त्यांचे निवडीचे पत्र रमेश पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी माढा विधान सभा, कैलास तोडकरी अध्यक्ष राष्ट्रवादी माढा तालुका, संभाजी गोटू पाटील अध्यक्ष युवक राष्ट्रवादी माढा तालुका, रामभाऊ शिंदे, विठ्ठल मिस्कीन, नयन सुरवसे, धनाजी गोफणे, केशव ठेंगल, रामभाऊ नवले, हे उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here