कारुंडे गावातील थेट जनतेच्या सरपंचाच्या निर्णयाला थेट जनतेचा लगाम

कारूंडे ( बारामती झटका )

कारूंडे ता. माळशिरस येथील थेट जनतेतून सरपंच झालेले अमर जगताप यांच्या मनमानी कारभाराला थेट जनतेतून लगाम बसलेला असल्याने माळशिरस तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.
मौजे कारूंडे ता. माळशिरस येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनेतून निधीचा गैरवापर करणाऱ्यावर संबंधितावर कारवाई करून दलित वस्तू सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे यासाठी अनिरुद्ध उर्फ गोरख बाजीराव गायकवाड नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिज सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रा. कारुंडे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्याकडे 18/3 /2020 रोजी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण बसणार असल्याचे पत्र दिलेले असून त्यावर माळशिरसचे ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे, गणेश गायकवाड, विशाल गायकवाड, नाना गायकवाड, बापूराव गायकवाड अशा लोकांच्या सह्या असलेले निवेदन दिलेले असल्याने कारूंडे गावातील अनाधिकृत काम करणारे पदाधिकारी व प्रशासन यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरच्या तक्रारी अर्जामध्ये कारुंडे गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चौदाव्या वित्त आयोगामार्फत अनेक ठिकाणी दलित वस्तीत रस्त्याची कामे झालेली आहेत. सन 2017-18 मध्ये दलित वस्तीत रामचंद्र गेजगे यांच्या घराजवळून ते शामराव गायकवाड यांच्या घराच्या पाठीमागे पर्यंत कॉंक्रिटचा रस्ता झालेला असून तो सध्या सुस्थितीत होता. मौजे कारुंडे गावातील अनेक ठिकाणी दलित वस्तीत रस्ता झालेला नाही.

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी येणारा निधी खर्च न करता 2017- 18 मध्ये दोनच वर्षापूर्वी झालेला रस्ता करून त्यालाच पुन्हा नव्याने तयार करण्याचा कारूंडे ग्रामपंचायतचा आहे. त्यामुळे येणाऱ्या शासकीय निधीचा गैरवापर होत आहे. संबंधित अधिकाऱ्यावर व ग्रामपंचायत सदस्यावर कारवाई करून अनाधिकृत सुरू असलेल्या रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे अन्यथा 18 /3/2020 रोजी तहसील कार्यालय माळशिरस येथे आमरण उपोषणास बसणार आहोत या सर्वांची जबाबदारी आपणावर येईल अशा पद्धतीचे निवेदन दिलेले आहे. सदर निवेदनाच्या प्रती पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हाधिकारी, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here