खंडाळी येथे मातंग समाजातील तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी वैभवजी गिते साहेबांनी घेतली.

पीडित कुटुंबाच्या शेवटपर्यंत पाठीशी राहू – विकासदादा धाईंजे

अकलूज (बारामती झटका)


मौजे खंडाळी ता. माळशिरस जि. सोलापुर येथे दि. 1 मे 2020 रोजी मातंग समाजातील रामचंद्र विठ्ठल खंडागळे या तरुणाचा खुन झाला. या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते साहेब यांनी खंडाळी येथे भेट दिली. खंडागळे कुटुंबाचे सांत्वन केले. मयत रामचंद्र खंडागळे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. एक भाऊ मतिमंद आहे. ही परिस्थिती लक्षात घेता वैभवजी गिते साहेबांनी दोन लहान मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची घोषणा घटनास्थळीच केली.

तात्काळ समाजकल्याण व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून पीडित कुटुंबास तातडीची मदत देण्याच्या सूचना दिल्या. या घटनेत तीनही आरोपींना अटक केली असून आरोपी सध्या पोलीस कास्टडीमध्ये आहेत. विकासदादा धाईंजे यांनी कुटुंबास केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले. व तहसीलदार यांची भेट घेऊन तातडीची मदत, पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले. यावेळी एन.डी.एम.जे. चे नेते बाबासाहेब सोनवणे, भगवान भोसले, दत्ता कांबळे, समीर नावगिरे, वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र साळवे, कल्याण लांडगे, खंडाळीचे ग्रामपंचायत सदस्य महादेव साबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश वाघंबरे, आबा वाघमारे, योगेश खंडागळे, सौरभ वाघमारे, अभय वाघमारे, प्रवीण खरात, प्रकाश खरात तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. वैभव गिते व विकासदादा धाईंजे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबास कागदपत्रे काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. चार दिवस सुस्त असलेले प्रशासन आज गतिमान झालेले दिसले. गरिबांना न्याय कसा मिळवून द्यावा, हे आज डोळ्याने बघायला मिळाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here