खुडूस ग्रामपंचायतमध्ये स्थापनेनंतर पहिल्यांदा सत्तांतर

माळशिरस (बारामती झटका)

खुडूस ग्रामपंचायतीची 2019 ची निवडणूक थेट जनतेतुन सरपंच पदाची होती. आजपर्यंत माजी पंचायत समितीचे सभापती मच्छिंद्र ठवरे गटाची सत्ता होती. आज मच्छिंद्र ठवरेंच्या सत्तेला सुरुंग लागलेला असून विनायक ठवरे महालिंगेश्वर स्वाभिमानी विकास पॅनलचे १२ सदस्यासह विजयी झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे खुडूस ग्रामपंचायतकडे लक्ष लागून राहिलेले होते. सत्तांतर होणार का सत्ता अबाधित राहणार असे असताना अखेर खुडूस ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झालेली आहे.

खुडूस ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच पदासाठी पाच उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उभे होते. खुडूस ग्रामपंचायत ही पाच वार्डामध्ये विभागलेली असून खुडूस ग्रामपंचायतच्या सरपंचांना वार्ड निहाय मिळालेली मते चौगुले रामचंद्र मुरलीधर यांना वार्ड क्रमांक एक मध्ये 359, वार्ड क्रमांक दोन मध्ये ते 423, वार्ड क्रमांक तीन मध्ये 499, वार्ड क्रमांक चार मध्ये 323, आणि वार्ड क्रमांक पाच मध्ये 298 अशी एकूण 1902 मते पडली. ठवरे दादासो ज्ञानोबा यांना अनुक्रमे वार्ड क्रमांक एक 13, वार्ड क्रमांक दोन 5, वार्ड क्रमांक तीन 12, वार्ड क्रमांक चार 11, वार्ड क्रमांक पाच 10, अशी 51 मते पडली. ठवरे विनायक नामदेव वार्ड क्रमांक एक 440, वार्ड क्रमांक दोन 531, वार्ड क्रमांक तीन 490, वार्ड क्रमांक चार 240, वार्ड क्रमांक पाच 301, अशी एकूण 2002 मते आहेत. मोहिते रणजीत यशवंत वार्ड क्रमांक एक 9, वार्ड क्रमांक दोन 0, वार्ड क्रमांक तीन 12, वार्ड क्रमांक चार 37, वार्ड क्रमांक पाच 20, अशी एकूण 78 मते पडली. साठे मकरंद नागनाथ वार्ड क्रमांक एक 1, वार्ड क्रमांक दोन 1, वार्ड क्रमांक 3, वार्ड क्रमांक चार 8, वार्ड क्रमांक पाच 9, अशी एकूण 22 मते मिळाली. वरीलपैकी कोणतेही नाही नोटा 17 असे सरपंच यांना वार्ड निहाय मिळालेली मते एकूण मतदान 4072 झालेले होते. निवडून आलेले सदस्य वार्ड निहाय वार्ड क्रमांक 1 लोखंडे रावजी नानासो 347, (सरगर बाजीराव हनुमंत विजयी 469), नोटा 7, (कारंडे महावीर बबन विजय 476), तांबवे देविदास संभाजी 338, नोटा 9, (ठवरे सुनिता संभाजी विजयी 485), ठवरे सुशीला भिवाजी 335, नोटा 3 असे वार्ड मध्ये 3 सदस्य निवडून आलेले असून त्या वार्ड मध्ये 823 मतदारांनी आपला हक्क बजावला होता.

वार्ड क्रमांक 2 (दोलतडे विठ्ठल उत्तम 521 विजयी) ठवरे उत्तमराव विठोबा 15 लोखंडे काशिलिंग आप्पा 423 नोटा 2 झंजे केशर ज्ञानदेव 456 (झंजे सीमा संजय 496 विजयी) नोटा 9 (निकम प्रभावती अंकुश 486 विजयी) निकम मनीषा शहाजी 465 नोटा 10 दोन नंबर वार्डामध्ये एकूण 961 मतदारांनी आपला हक्क बजावला होता वार्ड क्रमांक 3 (ठवरे अंकुश बापू विजयी 573) ठवरे तुकाराम बापू 425 वावरे बाळासाहेब शंकर 16 नोटा 6 (चौगुले श्रद्धा सतीश विजयी 524) दोलतडे अर्चना सुनील 482 नोटा 14 (कांबळे साधना लक्ष्मण विजयी 592 )सुरवसे रेश्मा बाबुराव 405 नोटा 23.
तीन नंबर वॉर्डांमध्ये एकूण 1020 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता
वार्ड क्रमांक चार (साठे दादा जगन्नाथ विजय 335) साठे पोपट विष्णू 278 नोटा 11 (सकट मयुरा नागनाथ 301) साठे वनिता शिवाजी 301 नोटा 22 दोन्ही उमेदवारास समसमान मते पडले असता सकट मयुरा नागनाथ यांची चिठ्ठी निघून त्या विजयी झाल्या (ठवरे विमल महादेव विजयी 318) शेंडगे रुक्मिणी दादासो 286 नोटा 20 सदरच्या चार नंबर वॉर्डांमध्ये हे 624 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

वार्ड क्रमांक पाच मध्ये कांबळे (आदिनाथ महादेव विजयी 347) कांबळे सिद्धार्थ लक्ष्मण 277 नोटा 20 ठवरे आप्पा महादेव 294 (बनकर पांडुरंग साधू विजयी 330) नोटा 20 कांबळे कल्पना राजेंद्र 300 (साठे पल्लवी विनायक विजयी 323) नोटा 21

वार्ड क्रमांक पाच मध्ये एकूण 644 मतदारांनी आपला हक्क बजावला होता अतिशय चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीमध्ये मतदारांनी सत्तांतर पंचवीस वर्षाची असलेली सत्ता उलटून सत्ताधाऱ्यांना धक्का दिलेला आहे सरपंच बरोबर 12 सदस्य निवडून आलेले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित करताच कार्यकर्त्यांचा जल्लोष गुलालाची उधळण फटाक्यांची आताषबाजी करण्यास सुरुवात झाली माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी चौक बंदोबस्त ठेवलेला होता माळशिरस तहसीलदार अभिजीत पाटील नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लकडे व श्री माने यांनी खुडूस ग्रामपंचायतचे निवडणुकीचे काम पाहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here