ग्रामपंचायत माळेवाडी (अ)घंटागाडी लोकार्पण संपन्न.

माळेवाडी (अ)(बारामती झटका)

मौजे माळेवाडी (अ) येथे ग्रामपंचायतीचा १४ वा वित्त आयोग व ग्रामपंचायत निधी मधून कचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाडीचे लोकार्पण पंचायत समितीच्या सभापती सौ वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले,यावेळी जि प सदस्या सुनंदा फुले यांची प्रमुख उपस्थिती होती…

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व सूत्र संचालन प्रा अरुण खंडागळे यांनी केले…यावेळी टॅलेंट हंट स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झालेल्या जि प आदर्श प्रा शाळा माळेवाडी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार मा सभापती यांच्या हस्ते करण्यात आला तसेच वेटलिफ्टींग राज्य स्तरावर निवड झालेली कु अनुष्री फुले हीचाही सन्मान केला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून उपसरपंच डॉ अमोल माने यांनी ग्रामपंचयतीमार्फत केलेल्या विकासकामांचा आढावा व काही मागण्या आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या… सभापती सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी ग्रामपंचयतीमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल सरपंच उपसपंच व सर्व सदस्य यांचे कौतुक केले व दिवाळीच्या सर्व नागरिकांना मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले.
आभारप्रदर्शन सरपंच जालिंदर फुले यांनी केले व लवकरच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले..
कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने, अॅड शिवाजी नरुटे,उपअभियंता शेख,पशुधन अधिकारी ठवरे, मुख्याध्यापिका दळवी मॅडम,सदस्य किसन बनकर,शुक्ला एकतपूरे,प्रिया नागणे,अनिता शिंदे,रामचंद्र नरुटे,सावता बनकर,मारुती खंडागळे,अरविंद राऊत,ग्रामविकास अधिकारी बाबर साहेब,कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here