ग्रामीण भागातील शाळा टिकल्या पाहिजेत -आ. संजयमामा शिंदे.


टेंभुर्णी (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याला दिशा देण्याचे काम माढा तालुक्यातील शिक्षण विभागाने केले आहे, शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग येत आहेत. त्यामुळे पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजातील ज्ञान किती मिळते याकरिता ग्रामीण भागातील शाळा टिकल्या पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
अकोले खुर्द तालुका माढा येथे शिक्षण विभाग पंचायत समिती व बबनरावजी शिंदे माध्य. विद्यालय अकोले यांच्या विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशालेची विद्यार्थी कु. स्नेहल धनवे, कु. ईश्वरी पवार होती. याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य बंडू नाना ढवळे, अंजनादेवी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, उपसभापती धनाजी जवळगे, सदस्य आप्पासाहेब उबाळे, प्राचार्य राजेंद्र ठोंबरे, गटशिक्षणाधिकारी मारूती फडके, माढा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय मोरे, केंद्रप्रमुख भाऊराव शिंदे, माजी संचालक दिपक पाटील, माजी पोलीस निरीक्षक बापूसाहेब शिंदे, राजकुमार पाटील, सरपंच माऊली घाडगे, माजी सरपंच महादेव घाडगे, शहाजी पाटील, नागेश पाटील, चेअरमन हरिदास पाटील, गणेश पाटील, संचालक संतोष पाटील, पंडित पाटील, अनिल तोडकर, औदुंबर पाटील, नानासाहेब नवले, प्रकाश घाडगे, सदस्य भारत नवले, अशोक पाटील, दत्तात्रय भांगे, अनिल महाडिक, नागनाथ नवले, प्राचार्य जवानसिंग रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद शाळा, लऊळ येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी गायत्री सरडे हिने नाट्यछटा सादर केली. प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले की, हितगुज, चर्चा व्हावी, मुलींचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच चांगली गुणवत्ता मिळवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here