चाकोरे येथे उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके व माऊली जमदाडे यांच्यात लढत

तर, पोपट घोडके व संतोष दोरवड यांच्यात लढत

चाकोरे (बारामती झटका)

चाकोरे ता. माळशिरस येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री चक्रेश्वर तरुण मंडळ आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दि. 26 जानेवारी 2020 रोजी दुपारी २ वाजता चाकोरे, प्रतापनगर ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर कुस्ती मैदान महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रयमामा भरणे, चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, दि सासवड माळी शुगर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजनभाऊ गिरमे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रदीपमामा जगदाळे, उद्योगपती राम जगदाळे, उद्योगपती बलराज माने, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न होणार आहे. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पै. हनुमंतराव शेंडगे, पै. युवराज केचे, पै. बापू कुंभार हे करणार आहेत.
या कुस्ती मैदानामध्ये इनाम रुपये २ लाख रुपयांसाठी उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके व माऊली जमदाडे यांच्यात लढत होणार आहे. तर इनाम रुपये १ लाख 51 हजार रुपयांसाठी पोपट घोडके व संतोष दोरवड यांच्यात लढत होणार आहे.
तरी कुस्ती शौकिनांनी या जंगी मैदानास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री चक्रेश्वर तरुण मंडळ व समस्त चाकोरे ग्रामस्थ यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here