छत्रपती शिवाजी कॉलेज वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

सातारा (बारामती झटका)

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डेक्कन जिमखाना पुणे आणि विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे सांघिक विजेतेपद, रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराने पटकावले. महाविद्यालयाच्या या यशस्वी संघामध्ये सुजित काळंगे आणि दत्तात्रय चोरमले हे दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत वैयक्तिक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सुजित काळंगे या विद्यार्थ्याने मिळवला. आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालय, कडा ता. आष्टी जि. बीड यांनी आयोजित केलेल्या आनंदराव धोंडे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दत्तात्रय चोरमले या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक संपादन केला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, उपप्राचार्या डॉ. अनिसा मुजावर, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. कांचन नलावडे, डॉ. मानसी लाटकर व डॉ. संजयकुमार सरगडे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना वक्तृत्व व वादविवाद समितीचे प्रमुख प्रा. गजानन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here