जनजागरण मोहीम यशस्वीपणे सम्पन्न


माळीनगर (बारामती झटका)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बिजवडी या ठिकाणी जिल्हा परिषद ,सोलापूर आरोग्य विभाग,प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे सौजन्याने चिकून गुन्या व डेंग्यू ताप करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनजागरण मोहीम यशस्वीरित्या सम्पन्न झाली.सध्या अनियमित वातावरणामुळे तालुक्यात विषाणूजन्य ताप व डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे,यामुळे दिनांक 10 डिसेंबर 2019 रोजी पंचायत समिती माळशिरसच्या आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग ,महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग यांचे वतीने तालुक्यातील सर्व गावांमध्ये एकाच दिवशी जनजागरण व उपायोजना मोहीम आयोजित करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यामुळे जनजागरण मोहीम राबवणे ही गरज ओळखून जि. प.प्रा.शाळा,बीजवडी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून तसेच प्रबोधनात्मक नाटिका सादर करून लोकांना सदरच्या समस्येबाबत मनोरंजनातून जाणीव जागृती करून देण्यासाठी प्रयत्न केला.त्यांनतर विदयार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना चित्रफितीच्या माध्यमातून डेंग्यू ताप, चिकून गुन्याचा प्रसार करणाऱ्या एडिसी इजिप्ती डासाबाबत तसेच डेंग्यूची लक्षणे,प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घ्यावयाची काळजी याबाबतीची माहिती सदरील चित्रीफितीतून उपस्थितांना दाखवण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्वांना डेंग्यू जनजागरण बाबत प्रतिज्ञा घेतली त्या अंतर्गत मी माझा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करेन, डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्यानंतर डॉक्टराचा सल्ला घेईन,घरातील भांडी,टाक्या स्वच्छ करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन म्हणून पाळेन,परिसरात पाणी साठणार नाही याची काळजी घेईन इ. बाबींचा समावेश होता.सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी बिजवडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज शिंदे ,प्राथमिक आरोग्य केंद्र लवंगचे डॉ.संतोष खारतोडे, आरोग्य सहायक आर.टी. कांबळे,ए. व्ही.आंची तसेच आरोग्य सेविका आर. पी.ठाकूर मॅडम जि. प.प्रा.शाळा,राव बहाद्दूर गट येथील उपक्रमशील शिक्षक श्रीकांत राऊत सर,आशा सेविका कविता नलवडे मॅडम,अंगणवाडी सेविका मोरे मॅडम,तुपे मॅडम,गिरीजा गेजगे मॅडम,सारिका चव्हाण मॅडम यांचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज कांबळे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीकांत राऊत सर यांनी करून खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नवनवीन व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here