जे.एल.म्हात्रे कंपनीने आळंदी पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचे केले मात्रे.

ठेकेदारांना नाही तर अधिकाऱ्यांना जनाची नाही, तर मनाची लाज वाटायला हवी अशा संतप्त प्रतिक्रिया.

माढा लोकसभेचे विद्यमान विकासप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लक्ष देण्याची गरज.

माळशिरस ( बारामती झटका )

आळंदी पुणे पंढरपूर या पालखी महामार्गाचे धर्मपुरी ते खुडूस यादरम्यान जे एल म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने रस्त्याचे काम घेतलेले आहे. सदरचे काम अंदाज पत्रक व गुणवत्ता यानुसार होत नसल्याने म्हात्रे कंपनीने आळंदी पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचे मात्रे केलेले असल्याने सदरचे काम करणाऱ्या ठेकेदारांना नाहीतर अधिकाऱ्यांना जनाची नाहीतर मनाची तरी लाज वाटायला हवी अशा संतप्त प्रतिक्रिया वैष्णव भाविक व स्थानिक नागरिक यांच्या मधून येत आहेत माडा लोकसभेचे विद्यमान विकास प्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी पुणे पंढरपूर पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Ki
आळंदी पुणे पंढरपूर या पालखी महामार्गाचे माळशिरस तालुक्याच्या हद्दीमध्ये धर्मपुरी ते खुडूस या दरम्यान जे.एल. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने काम घेतलेले आहे. सदरच्या कामाच्या अंतरामध्ये अर्थ वर्क मातीचे काम सब ठेकेदार यांना दिलेले आहे काही ठेकेदार यांनी पोट ठेकेदार यांच्याकडून काम करण्याचे सुरू आहे अनेकांना रस्त्याच्या कामाचा अनुभव नाही अशाही पोट ठेकेदार यांचेकडून काम सुरू आहे. ठेकेदार यांना पाठीशी म्हात्रे कंपनीचे मॅनेजर पासून सुपरवायझर पर्यंत काम करणारे पाठीशी घालत आहेत कारण हॉटेल व लॉज वर मौज मजा करीत आहेत.


रस्ता खोदाई काम करून सदर ठिकाणी हार्ड व स्वाफ्ट मुरूम टाकून पाणी मारून दबाई करणे गरजेचे आहे काही ठेकेदारांनी मुरूम टाकण्या ऐवजी प्रमाणापेक्षा मोठे दगड अस्ताव्यस्त टाकलेले आहेत त्यावर काही ठिकाणी माती टाकलेली आहे त्यामुळे सदर ठिकाणचा रस्ता भविष्यात खचणार आहे वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मुरूम टाकल्यानंतर खडीचा थर देऊन त्यावर हॉट मिक्स डांबराचा थर दिला जातो अशा तापमानाचा विचार न करता घाईगडबडीत खडी व मिक्स डांबराचा तर दिलेला असल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे रस्ता सर्फीस्ट्रेशन मध्ये दिसत नसून चढ-उतार रस्त्यावर दिसत आहे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचलेले पहावयास मिळत आहे.


पूर्वीचा डांबरी रस्ता सुस्थितीत होता सदरच्या रस्त्यावरील खडी व डांबर मशिनच्या साह्याने अलगद काढून पुन्हा तेच डांबर व खडी गरम करून पुन्हा रस्त्याच्या कामासाठी वापरली जाते का अशीही शंका व्यक्त केली जात आहे.


रस्त्यामध्ये केलेले दुभाजक सुद्धा निकृष्ट दर्जाचे आहेत साधे मोटर सायकल जरी जोरात टायर गेला तरीसुद्धा दुभाजक तुटण्याची शक्यता आहे आणि दुभाजक का मध्ये माती भरणे गरजेचे असताना सदर ठिकाणी मोठी दगडे व मुरूम टाकलेला आहे त्यामुळे भविष्यात फुल झाडे लावण्यास अडथळा येणार आहे.


रस्त्याच्या साईट गार्ड भिंत काँक्रीट मध्ये तयार करीत असताना जमिनीवरील मातीमध्ये तयार केलेले आहे साईड गार्ड भिंत तयार करीत असताना मातीच्या ठिकाणी सुरुवातीस कठीण मुरूम किंवा व्यवस्थित पीसीसी करणे गरजेचे होते सदरची साईड गार्ड भिंत योग्य प्रमाणात सिमेंट व खडी न वापरल्यने हाताने ढकलून सुद्धा फडू शकेल एवढी मजबूत झालेली आहे.


प्रांत व तहसील कार्यालय मधील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर रस्त्याच्या कामासाठी मुरूम कोठून आणला व रस्त्यामधील माती कोणास विकली गेली याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे होते मुरूम शेतकऱ्याचा अथवा इतर ठिकाणाहून आणतेवेळी शासनाचा महसूल वापरलेल्या मुरमा एवढा न भरता ठराविक रक्कम भरून रकमेपेक्षा दहापट मुरूम ज्यादा नेहलेला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची डोळेझाक होऊन हाताची गूडी आणि तोंडावर बोट ठेवल्यासारखे झालेले आहे.


पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी बाजूचा परिसर उंच झालेला असून रस्ता शेताच्या पेक्षा कमी उंचीचा झालेला असल्याने भविष्यात रस्त्यावरच पाणी राहण्याची काही ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे भविष्यात रस्त्यावर पाण्याची अडचण येणार आहे.
आषाढी वारीनिमित्त काही वारकरी संप्रदायातील मंडळी यांनी रस्त्याचे काम पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केलेली आहे. रस्त्याचे काम सुरू आहे. लगेच रस्ता खचला कसा अशीही शंका व्यक्त करून निकृष्ट व दर्जाहीन रस्त्याच्या विरोधामध्ये आषाढी वारीच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शासकीय पूजेच्या वेळी आल्यानंतर रस्त्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर आंदोलन करण्याची तयारी असल्याची भावना विश्व वारकरी सेनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास कदम पाटील चर्चा करताना व्यक्त केली.


माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी व रस्त्याचे काम पाहणारे अभियंता यांची बैठक लावून सदर कामाची केंद्रीय दक्षता व गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी करावी. प्रत्येक किलोमीटर मध्ये दक्षता व गुण नियंत्रण पथकाकडून चाचण्या घेऊन पडताळणी करावी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी समस्त वैष्णव व स्थानिक नागरिक यांच्या मधून होत आहे.
म्हात्रे कंपनीने अंदाजपत्रकानुसार व निकृष्ट काम केलेले असल्यास उर्वरित बिल आधार करीत असताना कपात करावी आणि दर्जेदार काम करून घेण्याकरता आपण स्वतः लोकप्रतिनिधी या नात्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेची इच्छा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here