झेडपीत राहणार राष्ट्रवादीचे वर्चस्व

सोलापूर (बारामती झटका)

राजकारणाबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेऊन केलेली घोषणा पोकळ ठरणार आहे. झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहील असा विश्वास विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी सोमवारी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत झेडपीचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली. भाजपशी जुळवणी करून ते झेडपीचे अध्यक्ष झाले होते. आता लोकसभेला भाजप विरोधात गेल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास व आगामी अध्यक्ष भाजपला राहील अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, झेडपी अध्यक्ष निवडीवेळी संजय शिंदे अपक्ष होते. भाजपने त्यांना त्यावेळी साथ दिली. आता अविश्वास ठराव आणायचा म्हणजे मोठी प्रक्रिया आहे. अविश्वास साध्य करण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ४३ उमेदवारांची संमती लागणार आहे. इतके ही संख्याबळ भाजपकडे नाही. त्यामुळे अध्यक्ष शिंदे आपला कार्यकाल पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय नवीन अध्यक्ष निवडीवेळी भाजप अपेक्षित संख्याबळापर्यंत जाईल का याबाबत शाश्वती वाटत नाही, असे ते म्हणाले.

झेडपी सदस्य सुभाष माने यांनी झेडपी अध्यक्ष शिंदे कार्यकाल पूर्ण करतील असे म्हटले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीला ते उपस्थित होते. अविश्वास ठराव आणणे सोपे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाहता शिंदे आपला कार्यकाल पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे सदस्य उमेश पाटील यांनीही आगामी काळात राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल असा दावा केला. सदस्यांना पक्षाने व्हीप बजावल्यावर विरोधात मतदान करणे महागात पडणार असल्याने सत्तांतराचे भाजपचे स्वप्नच राहिल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here