डॉ.श्री. एम.के. इनामदार यांच्या शुभहस्ते रत्नत्रय संस्थेचा ध्वजारोहण व वार्षिक निकाल

सदाशिवनगर (बारामती झटका)

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर, संचलित रत्नत्रय इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मांडवे या शाळेचा ध्वजारोहण समारंभ व वार्षिक निकाल वितरण कार्यक्रम महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त १ मे २०१९ रोजी स. ८.४५ वा. होणार आहे. डॉ. श्री. एम.के. इनामदार आश्विनी हॉस्पिटल, संग्रामनगर अकलूज यांच्या शुभहस्ते व श्री. अनंतलाल रतनचंद दोषी संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी, सदाशिवनगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. त्यावेळी श्री. प्रमोद अ. दोषी अध्यक्ष, श्री. तुषार गांधी उपाध्यक्ष, डॉ. श्री. निवास गांधी सांस्कृतिक क्रीडा मंत्री, श्री. दैवत वाघमोडे मुख्याध्यापक, श्री. समीर देशपांडे समन्वयक, श्री सतीश हांगे पर्यवेक्षक, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक प्रशाला समिती सदस्य, व सर्व ग्रामस्थ सदाशिवनगर, मांडवे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.

नवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here