देशमुख कुस्ती केंद्राचे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश

माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये कै. पै. ज्ञानदेव (देना) देशमुख कुस्ती केंद्र माळशिरस या कुस्ती केंद्रातील मुलांनी दैदिप्यमान यश मिळविल्याने मार्गदर्शक हनुमंततात्या देशमुख, वस्ताद शिवाजीराव देशमुख, युवानेते टी.डी. देशमुख, अनिल देशमुख यांच्यासह माळशिरसकरांच्या वतीने सर्व विजेत्यांचे निवड झाल्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे.


सोलापूर जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये ७९ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पै. युवराज कोळेकर, ७४ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पै. राहुल चव्हाण, ८० किलो वजनगटात पै. शिवाजी हुलगे, ३८ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पै. अजय पवार, द्वितीय क्रमांकामध्ये पै. माऊली पालवे, पै. सार्थक देशमुख, पै. आण्णा वाघमोडे अशा युवा पैलवानांनी शालेय स्पर्धेत यश संपादन केलेले आहे. त्यांना घडविण्यामध्ये वस्ताद शिवाजीराव देशमुख यांचे योगदान आहे. सदरची तालीम तुकाराम देशमुख, महादेव देशमुख, हनुमंतराव देशमुख, पांडुरंग देशमुख, आदी मान्यवरांच्या मागदर्शनाखाली कार्यरत आहे. दिवसेंदिवस या कुस्ती केंद्राची घोडदौड वाढत आहे.
नगराध्यक्षपदी द्रोपदी देशमुख यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत गुलालाची मुक्त उधळन करीत आनंद व्यक्त करून जल्लोष केला.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here