धर्मपुरी येथे जागतिक मृदा आरोग्य दिन उत्साहात साजरा.

धर्मपुरी (बारामती झटका )

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने 5 डिसेंबर जागतिक मृदा आरोग्य दिनाचे औचित्य साधुन धर्मपुरी येथे मृदा पञिका वाटप कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमावेळी माती नमुने काढणे तपासणी साठी देणे तसेच तपासणी नंतरच्या अहवाला नुसार खताची माञा देणे माती आरोग्य व इतर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे व शंकेचे निरसण करण्यात आलेने शेतकऱ्यांच्या मधुन समाधान व्यक्त होत आहे त्याच बरोबर दुष्काळी परिस्थिती मुळे होणाऱ्या चारा टंचाईचा सामना करणेसाठी मुरघास निर्मिती विषयी मार्गदर्शन करुन कृषी विभागातील इतर योजनांची माहिती समजावून सांगण्यात आली तालुका कृषी अधिकारी ननवरेसाहेब व नातेपुते मंडल कृषी अधिकारी धायगुडेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक एम एन बोरुडे व कृषी सहाय्यक दिडके यांनी ग्रामपंचायत सदस्य शेतकरी बांधव व ग्रामस्त यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले धर्मपुरी बरोबरच लोणंद , लोंढेमोहितेवाडी . फडतरी .शिवारवस्ती व पिंपरी आदि गावामध्ये जागतिक मृदा दिनाचे कार्यक्रम करण्यात आलै यामुळे शेतकरी वर्गात कृषी विभागाच्या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here