नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबर पासून सुरू होईल

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई (बारामती झटका)

नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होईल. बारावीची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा तालुकास्तरावर घेण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. ते पुढे म्हणाले की, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉगचे पेपर याच वर्षी घेतले जातील, त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. समाज माध्यमांच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे त्यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे, आपल्या आरोग्याची आम्ही हमी घेतोय. त्यामुळे याबद्दल कोणी चिंता बाळगण्याचे कारण नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व निर्णय घेतले गेले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतोय, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेतल्या जातील. स्वायत्त आणि खाजगी विद्यापीठे यांना महाराष्ट्र शासनातर्फे पत्र पाठविण्यात येणार आहे. स्वायत्त शिक्षण संस्थांची भूमिका ही राज्य शासनाच्या निर्णयानुरूप असणार आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की ज्याने 25,00,000 विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहे. यामध्ये केवळ विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
मुक्त विद्यापीठाला निर्णय लागू
मुक्त विद्यापीठाला राज्य शासनाचा निर्णय लागू असेल. अकृषी विद्यापीठांसाठी जे नियम असतील तेच त्यांनाही लागू होतील. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. पीएचडी आणि एम‌. फिल. चे प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा विचार शिक्षण विभाग करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here