निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर (बारामती झटका अनिल पाटील यांजकडून)

निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. रायगड; रत्नागिरी;सिंधुदुर्ग येथील शेती; घरे आणि मालमत्तेचे 20 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोकणासोबत पुणे नाशिक आणि पालघर याभागात ही निसर्ग चक्री वादळाचा फटका बसला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने 5 हजार कोटींचा मदत निधी द्यावा तसेच तातडीने 1 हजार कोटी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

कोकणात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ 200 कोटींची तातडीने दिलेली मदत अत्यल्प असून किमान 1 हजार कोटींची तातडीची मदत देणे आवश्यक होते असे ना. रामदास आठवले म्हणाले.

पालघर, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत. कोकणात सिंधुदुर्ग, मंडणगड, दापोली, श्रीवर्धन, रायगड येथे नुकसानाचे पंचनामे करावेत. काही ठिकाणी बेपत्ता लोकांचा तपास करावा. तसेच विजजोडणी चे काम युद्धपातळीवर करावे, कोकणात उखडलेले रस्ते उभारवेत अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here