“परकिया” चित्रपटाच्या टिमने आ.प्रशांत परिचारक यांची घेतली भेट

पंढरपुर (बारामती झटका)

पंढरपुर येथील निर्माता व दिगदर्शक सचिन धोत्रे, सतनाम फिल्मस निर्मित “परकिया” या
कॉमेडी, अॅक्शन व रोमान्सचा भरणा असलेला चित्रपटाच्या टिमने विधान परिषदचे आमदार श्री. प्रशांत परिचारक यांची भेट घेतली. यावेळी दिगदर्शक सचिन धोत्रे, नायक चेतनकुमार लमाण, नायिका रूचिका शिवशरण, सोमा होरणे, ऋतुराज साळुंखे, रविराज पोतदार, राहुल पवार, कृष्णा लाखे आदी कलाकार उपस्थित होते.

सोमवार पासुन या चित्रपटाची ट्रेलर, गाणी पहायला मिळणार असल्याचे मार्केटींग प्रमुख साजिद शेख यांनी सांगितले. ग्रामीण भागातील तरूण चित्रपट निर्मितीमध्ये यशस्वी वाटचाल करताना पाहुन अभिमान वाटत असल्याचे आ.परिचारक यांनी सांगितले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तरुणाईच्या उसळत्या प्रेमाचा अदभूतपूर्ण अनुभव असलेला “परकिया” हा मराठी चित्रपट येत्या १४ जुनला प्रदर्शित होणार असल्याची माहीती दिगदर्शक सचिन धोत्रे यांनी दिली. या चित्रपटाचे चित्रिकरण पंढरपुर, पुणे, उस्मानाबाद, सातारा व रत्नागिरी येथे करण्यात आले. पंढरपुर येथील सचिन धोत्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असुन दिगदर्शकाची जबाबदारी देखील त्यांनीच पार पाडली आहे. सचिन धोत्रे यांचा हा पहिलाच चित्रपट निर्मितीचा प्रयत्न आहे. या चित्रपटात नायकाच्या मुख्य भुमिकेत चेतनकुमार लमाण तर नायिकेची भुमिका रूचिका शिवशरण साकारत आहेत. तर सुशांत कोळी, रेखा दहातोंडे, करण अनपट, सुशांत आंबुरे, मयुरी शिंदे, विजय शहाणे, शुभम नवले, रवि शहापुरकर यांनीही भुमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे  छायाचित्रण रविराज पोतदार यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here