पै. सिकंदर शेख “सम्राट लाल मातीचा” पुरस्काराचा मानकरी

कळंब वालचंदनगर (बारामती झटका)

यावर्षीचे मैदानी कुस्तीचे अर्धशतक पुर्ण कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थेद्वारे यावर्षीपासून देण्यात येणारा पहिला “सम्राट लाल मातीचा” किताब सिकंदर शेख ने जिंकला. कळंब वालचंदनगर येथे आयोजित निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात पै. सिकंदर शेख याने पै. मनीष कुमार वर विजय मिळवत जानेवारी पासून ते आत्तापर्यंत मैदानी ५० कुस्त्या जिंकल्या. कळंब वालचंदनगर येथे झालेली त्याची ५०वी विजयी कुस्ती ठरली. कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेद्वारे यावर्षी २०१९ चा प्रथमच दिला जाणारा “सम्राट लाल मातीचा” हा पुरस्कार व रोख १ लाख रु. इनाम पै. सिकंदर शेख गंगावेश तालीम कोल्हापूर याला जाहीर झालेला आहे.  “सम्राट लाल मातीचा” पुरस्कार कशासाठी..? महाराष्ट्राला मातीतल्या मैदानी कुस्तीची परंपरा आहे. अनेक वर्षे या मैदानी कुस्तीत बरेच चढउतार होत आले. मात्र, काळाच्या अनेक स्थित्यंतरात लाल मातीतली कुस्ती जिंकली. आजमितीला दररोज कुस्त्या होतात. आयोजक कुस्तीवर चिक्कार पैसे बक्षीस म्हणून देतात. अर्थार्जन म्हणून पैलवान हे बक्षीस वापरतो. मात्र मैदानी कुस्तीला स्थिर असे व्यासपीठ नाही. या मातीने आजवर अनेक मल्ल मैदानी कुस्तीत दिले, जे कोणत्याही राज्यस्तरीय, राष्ट्रीय कुस्तीच्या समान होते. राज्यस्तरीय व राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धांना स्थिर व्यासपीठ आहे. मात्र मातीत कुस्ती करणारे मल्ल यांना ते नाही. या पुरस्काराने पैलवान दररोज कुस्त्या करतात. मात्र, या कुस्त्या कशासाठी कराव्यात याचे मोजमाप होईल ? कसे होईल पुरस्काराचे मानांकन ? दरवर्षी १ जानेवारी पासून महाराष्ट्रातील जे जे मल्ल सलग ५० कुस्त्या करतील त्यांना हा पुरस्कार जाहीर होईल. दरवर्षी एक पुरस्कार याप्रमाणे अजूनही काही पुरस्कार यात देण्यात येतील. जे प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी सांगितले जातील. यावर्षी पैलवान सिकंदर शेख याला “सम्राट लाल मातीचा” पुरस्कार व १ लाख रु.रोख इनाम देऊन गौरविण्यात येईल. एका भव्य कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार लवकरच देण्यात येईल अशी माहिती कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रसिद्धी विभाग पदाधिकाऱ्यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here