प्रतापसिंहांचा माझ्या जडणघडणीत सिंहाचा वाटा पालकमंत्री.

अकलूज (बारामती झटका):

लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील सोलापूर लोकसभेसाठी उभे असताना, मी शहराचा सरचिटणीस होतो. त्यावेळी साहेबांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे सांभाळली साहेबांचा विश्वास संपादन केला, त्यामुळे साहेबांनी माझी विधानसभेसाठी शिफारस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याकडे केली होती. त्यामुळे मला आमदार होण्यास साहेबांनी मदत केली आणि खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय जडणघडणीत हातभार लागला असल्याचे मत सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी अकलूज ता. माळशिरस येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर युवा नेते डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सोपानराव नारनवर, माजी पंचायत समिती सदस्य के.के. पाटील, फलटण-लोणंद रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅडसोमनाथ वाघमोडे, भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे, कॉन्ट्रॅक्टर शंकरराव देशमुख, युवा नेते सुजायसिंह माने पाटील, भाजपचे युवक नेते अतुलजी सरतापे ,माळशिरस तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अॅड बि. वाय. राऊत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पांडुरंग वाघमोडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ,ओबीसीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, अमित शहाचे खंदे समर्थक काशिनाथ देवकाते पाटील ,पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव, अजय सकट ,भाजपचे युवा नेते संगमचे सरपंच महेशराव इंगळे ,अल्पसंख्यांक चे जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबू, सोलापूरचे नरेंद्र काळे ,भानुदास सालगुडे पाटील,सुधीर रस्ते, संजय देशमुख ,ज्येष्ठ विचारवंत सोमनाथ पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
अकलूज येथे महादेव कावळे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांनी उज्वला गॅस व शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रमामध्ये पालकमंत्री बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले सध्याचे सरकार गोरगरिबांसाठी काम करीत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भ्रष्टाचार कमी केलेला आहे. वैयक्तिक लाभ देऊन सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे .बजेटमध्येही अनेक तरतुदी करून अनेक कामांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. माढा लोकसभा माळशिरस विधानसभा यामध्ये आपले प्रतिनिधी निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे सांगून आपल्या सरकारने मंजूर केलेल्या योजनांचे श्रेय स्थानिक प्रतिनिधी घेत असल्याचा टोला पालक मंत्री यांनी लगावला. स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांची उणीव भरून काढण्याचे काम युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील हे आपल्याला लाभलेले असून आपण त्यांना प्रामाणिकपणे साथ देऊ या असे सांगून उपस्थितांना आगामी लोकसभा व विधानसभेचे निवडून आणण्याचे संकेत देण्यात आले, यावेळी तालुकाध्यक्ष सोपानराव नारनवर ,अॅड सोमनाथ वाघमोडे ,बाळासाहेब सरगर, के.के. पाटील, हनुमंतराव सूळ व डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील आदींनी आपले विचार व्यचक्तस केले.उज्वला गॅस योजने अंतर्गत महिलांना गॅसा वाटप व शालेय विद्यार्थीींना सायकल वाटप महादेव कावळे यांच्या वतीने पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .महादेव कावळे मित्र मंडळाच्या वतीने मोठा गुलाबपुष्प हारामध्ये सत्कार पालकमंत्री युवानेते डॉ धवलसिंह मोहिते-पाटील ता.अध्यक्ष सोपानराव नारनवर यांना एकाच हारामध्ये घेऊन सत्कार करण्यात आला . सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विक्रांत देशमाने, बंडू खंडागळे ,आनंद सोनवणे, भैया चंदनशिवे, संतोष मोरे, संतोष वेदपाठक, काका केसकर ,राजू मोरे ,मंथन साळुंखे, लक्ष्मण सदाफुले, लखन गायकवाड, संजय खंडागळे, तेजस लांडगे, रणजित देशमुख, गणेश लोहार, सुलतान शेख, लक्ष्मण(तात्या) गायकवाड, गणेश चंदनशिवे, सागर झेंडे ,रुपेश लोंडे ,शक्ती माने, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची प्रस्तावना मुक्तार कोरबू यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले .
नवनवीन अपडेट व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका युट्युब चॅनेल ला सर्च करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा संपादक श्रीनिवास कदम पाटील मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 91 30 10 32 14

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here