फोंडशिरस येथे आ.रणजितसिंह मोहिते पाटील व आ.राम सातपुते यांच्या शुभहस्ते धुमधडाक्यात रस्त्याचे उदृघाटन संपन्न

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फोंडशिरस ते बोडरे वस्ती देवकर वस्ती रस्त्याचा भूमिपूजन.

आनेक दिवसाचा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सुटल्याने नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

फोंडशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील मौजे फोंडशिरस येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजूर झालेल्या फोंडशिरस ते बोडरे वस्ती देवकर वस्ती रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते या उभयतांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
फोंडशिरस बोडरे वस्ती हा रस्ता ग्राम सडक योजने अंतर्गत 3.500 km मध्ये त्याचे मजबुतीकरण देखबाल करणे तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर पॅकेज ADB SoL-15 कामाचे अंदाजपत्रक 275. 93 लक्ष मंजूर रस्त्याचे शनिवार दिनांक 5 जून 20 21 रोजी भाजपचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कुचेकर, शिवामृत दुध संघांचे व्हा.चेअरमन सावता ढोपे,पंचायत समिती विद्यमान उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, किशोरभैया सुळ, संतोष महामुनी,,राहुल वाघमोडे,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियता ढेरे साहेब,, विराज पाटील साहेब,रामकाका दाते,शिवाजी गोरे, हनुमंत पाटील,गोविंद पवार, हनुमंत कोडलकर,शंकर वाघमोडे,कृष्णदेव रणदिवे, अप्पासाहेब पवार, शंकर पाटील, दादा पाटील, संदीप गोरे, संतोष गोरे,पारसे साहेब, रामचंद्र पाटील,भानुदास मोटे, हनुमंत कुंभार व.. फोंडशिरस गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोंडशिरस गावातील बोडरे वस्ती व देवकर वस्ती येथील लोकांची अनेक दिवसाचि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न सुटणार असल्याने वस्तीवरील व फोंडशिरस गावातील लोकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here