बहुजन समाजाच्या वतीने बाळासाहेब धाईंजे यांच्या उमेदवारीची मागणी

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस राखीव विधानसभेसाठी भाजपमधून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी समस्त बहुजन समाजाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री तथा माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.


माळशिरस विधानसभेचे वातावरण सध्या तापू लागले असून अनेक आयात उमेदवारांनी या राखीव मतदारसंघातून उभा राहण्यासाठी तयारी दर्शवली आहे. अनेकजण वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवून उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र स्थानिक उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी सध्या जनता करू लागली असून स्थानिक प्रश्नांची जाण असणारे विद्यमान जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे यांना माळशिरस राखीव विधानसभेची भाजपमधून उमेदवारी देऊन तळागाळातील घटकाला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यासंदर्भात नुकतीच माळशिरस तालुका समस्त बहुजन समाजाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री तथा माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन समस्त बहुजन समाजाच्या वतीने बाळासाहेब धाइंजे यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली. यावेळी नंदकुमार केंगार, दयानंद धाईंजे, युवराज वाघमारे,दत्तु कांबळे पाटील, किरण सावंत, धनाजी पवार,सामाधान भोसले, बादल सोरटे, पप्पु गायकवाड, रजनिश बनसोडे, युवराज सातपुते,राहुल वाघंबरे, देवेंद्र कांबळे, मिलिंद गायकवाड, रविराज बनसोडे,सचिन करडे,महादेव समिंदर, प्रविण वाघमारे, दादा सरतापे,निसार शेख, रियाज मुजावर, शौकत शेख,चंद्रकांत सावंत, अजय धाईंजे, वरुण धाईंजे, प्रकाश सावंत, प्रनिल धाईंजे, शेखर सावंत, नानासाहेब ओहाळ, बापू खरात.रशिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब धाइंजे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील समस्त बहुजन समाजाने नेहमीच मोहिते पाटील हाच पक्ष समजून सामाजिक कार्य केले आहे.त्यामुळे बाळासाहेब धाइंजे यांच्यासारख्या उमद्या ,तरुण आणि तडफदार अशा कार्यकर्त्याला संधी मिळावी. यावेळी तालुक्यातील विविध गावातून आलेल्या मान्यवरांनी बाळासाहेब धाईंजे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी केली.या झालेल्या बैठकीनंतर अनेक संघटनांचा बाळासाहेब धाईंजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळत असुन सर्वच स्तरातून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली जात आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here