बारामतीत माता रमाई फाऊंडेशन आयोजित वंचित चषक…

बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल खरात यांच्या हस्ते उदघाटन

बारामती (बारामती झटका)

बारामती तालुक्यातील पणदरे गावात माता रमाई फाऊंडेशनच्या वतीने भव्य हाफपीच नाईट क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. सदर क्रिकेट सामन्यांचे उदघाटन भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीचे बारामती तालुका अध्यक्ष अमोल खरात यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सदर क्रिकेट सामान्यांच्या उद्घाटनादरम्यान भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष प्रतिक दामोदरे, सुभाष साठे, संघटक निलेश सोनवणे, आनंद लोंढे, सचिव योगेश गायकवाड, ग्रामशाखाध्याक्ष अभिशाल कांबळे, रोहित गजरमल तसेच गावातील विकास (काका) सोनवणे, नटवर गायकवाड, तेजस सोनवणे, अक्षय गायकवाड, बीएसपी कोषाध्यक्ष पुणे जिल्हा विशाल घोरपडे भीमराव सोनवणे, राजेंद्र राखपसरे,सनी राखपसरे विशाल (भैया) घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here