मंडल कृषी कार्यालये पडली ओस.

अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या हितासाठी तालुक्यामध्ये एक कृषी कार्यालय असते. शेतकर्‍यांना तालुका कृषी कार्यालयामध्ये लांबून येवू नये यासाठी शासनाने उदात्त हेतू ठेवून मंडल कृषी कार्यालयाची निर्मिती केलेली आहे आणि त्या कार्यालयामधून संबंधीत जोडलेल्या गावांचा कार्यभार चालत असतो. माळशिरस तालुक्यात अकलूज, पिलीव, माळशिरस, नातेपुते ही मंडल कार्यालय नावापुरतीच राहिलेली असून ओस पडलेली आपणास पहावयास मिळत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांमध्ये रोषाची भावना निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी चालू केलेली आहे. थेट शेतकर्‍यांना याचा फायदा व्हावा हा उदात्त हेतू त्यांनी ठेवून काही योजना व्यक्तिगत लाभाच्या शेतकर्‍यांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीचे काम वरिष्ठ पातळीवरुन जोरात चालू आहे. सध्या माळशिरस तालुक्यात यांत्रिकीकरणासाठी अर्ज मागविण्याचे काम युध्द पातळीवर चालू होते. आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेतकर्‍यांची कागदपत्रे जुळवाजुळव करुन मंडल कृषी कार्यालयाकडे धाव घेण्याचे काम चालू होते. दुपारी अकलूज कृषी मंडल कार्यालय या ठिकाणी गेलो असता त्याठिकाणी विचित्र प्रकार पहावयास मिळाला. अर्ज घेवून आलेले बागायतदार अभय भिमराव राचकर हे कार्यालयाच्या बंद दरवाज्यासमोर ताटकळत असलेले दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आत कोणीच नाही, असे त्यांच्याकडून उत्तर आलेनंतर त्यांनी दार उघडून खात्री करुन दिल्यानंतर पायाखालची वाळू सरकली. कारण शेतकर्‍यांनी धावपळ करुन कागदपत्रांची जमवाजमव केलेली असते. आणि जर अधिकारीच त्याठिकाणी हजर नसतील तर त्या शेतकर्‍यांनी कोणाकडे धाव घ्यायची ? हा प्रश्‍न निर्माण होत आहे. या अकलूज मंडलसह पिलीव, नातेपुते, माळशिरस येथील संबंधीत शेतकर्‍यांकडे कार्यालयाची चौकशी केली असता काही कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक हे अर्ज घेण्याचे काम करीत होते. सदर मंडलमध्ये मंडल अधिकारी दोन सुपरवायझर असतात. पिलीव वगळता सर्व ठिकाणी जबाबदार अधिकार्‍यांची नेमणूक केलेली आहे. सदरचे अधिकारी कार्यालयामध्ये हजर राहत नाहीत. कृषी सहायकांकडून कामे करुन घेतात. तेथेही शेतकर्‍यांना अनेक संकटांशी सामना करावा लागतो. जबाबदार अधिकारी नसल्याने कृषी सहाय्यक हे अपेक्षित उत्तर देत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी काय भुमिका घ्यावी, अशी त्यांची अवस्था होत आहे. तालुका कृषी अधिकारी ननवरे साहेब, यांच्याशी भ्रमणध्वनी (9403969504) वरुन दुपारी 4 वा. 13 मि. संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांचेशी संपर्क होवू शकला नाही. संतप्त शेतकर्‍यांच्यामधून असाही सूर निघत आहे की मंडल कृषी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल घ्यावेत, कारण असा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर भागामध्ये कामानिमित्त होतो असा नेहमीचेच उत्तर ऐकावयास मिळेल. यासाठी अशा पध्दतीचा अवलंब करावा. खर्‍या अर्थाने वस्तुस्थिती शेतकर्‍यांच्या समोर येईल. उपविभागीय कृषी अधिकारी, पंढरपूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर, विभागीय कृषी सहसंचालक पुणे, सध्याचे आयुक्त सचिद्र प्रतापसिंह हे आयुक्त असून नसल्यासारखे आहेत. त्यांचेकडे शेतकर्‍यांनी काय अपेक्षा करावी, त्यामुळे वरिल अधिकार्‍यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करावी व पुढील भविष्य काळामध्ये शेतकर्‍यांच्या कामासाठी कार्यालयामध्ये ठरलेल्या वेळेस हजर राहण्याच्या सक्त सुचना देण्याची संतप्त शेतकर्‍यांच्या मधून भावना होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here