मळोली गावच्या सौ. सुवर्णप्रभा घोरपडे यांना जिल्हास्तरीय कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

पंढरपूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मुख्याध्यापकांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने पुरस्काराचे आयोजन केले जाते. सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल मळोली गावच्या स्नुषा (सुन) सौ. सुवर्णप्रभा बाळकृष्ण घोरपडे यांना जिल्हास्तरीय कृतीशील मुख्याध्यापक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. कौसल्या शिंदे उपस्थित होत्या. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष हे सद्गुरु शांतीनाथ महाराज हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख शंकर वडणे, राज्य संघटक समाधान घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, बाळे पतसंस्थेचे चेअरमन श्रीधर उन्हाळे, उपाध्यक्ष श्रीनिवास येलपले, संतोष गायकवाड, सचिव विकास शिंदे, कुंडलिक पवार, राजेंद्र आसबे, भीमा व्यवहारे, शिवाजीराव शेंडगे, समाधान दुधाट, परमेश्वर व्हसुरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. सावंत म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात काम करणारी, सर्वच क्षेत्रात नवनिर्माण करणारी ही शिक्षक मंडळी असतात. वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत त्यांचा सन्मान झाला नाही, अशी खंत निरोपाच्या कार्यक्रमाच्या वेळी अनेक शिक्षक व्यक्त करीत होते. ही बाब लक्षात घेऊनच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जात असल्याची माहिती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.

पंढरपूर-कराड रोडवरील श्री विठ्ठल रुक्मिणी पॅलेस येथे रविवारी भरगच्च कार्यक्रमात पहिल्या सत्रात राज्यस्तरीय १५६ व दुसऱ्या सत्रात १७५ जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पहिल्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक जे.एस. आप्पा पाटील उपस्थित होते. तसेच प्रभाकर फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश घाटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एक पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. याबाबत विचार करून २०१४ पासून सदरच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहेत. राष्ट्र उभारणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा ही इच्छा होती. त्यानुसार राज्य शाळा कृती समितीकडून राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येत आहेत, असेही आ. सावंत यांनी सांगितले. सदगुरू शांतीनाथ महाराज यांनी राज्य शाळा कृती समितीकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची कौतुक करून पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मधील सर्व पदाधिकारी यांनी काटेकोर नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आसबे यांनी केले. आभार समाधान दुधाट यांनी मानले.

मळोली गावाच्या सौ. सुवर्नाप्रभा बाळकृष्ण घोरपडे यांना जिल्हा स्तरीय कृतीशील पुरस्कार मिळाल्याबद्दल मळोली गावचे माजी उपसरपंच जयसिंह रामचंद्र जाधव व चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव, मळोलीचे माजी पोलीस पाटील पांडुरंग उर्फ आप्पासो जाधव पाटील, शिवशंकर सोसायटीचे चेअरमन अरुण श्रीमंत पवार, माजी चेअरमन प्रा. आबासो नानासो जाधव व चंद्रकांत चांगदेव जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चांगदेव पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मारुती जाधव, शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशांकभैय्या जाधव पाटील, श्रीकृष्ण मध्यवर्ती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र जाधव, धवलसिंह युवा मंचाचे अध्यक्ष भारत बाळासाहेब जाधव, शिक्षक संघटनेचे नेते राजेंद्र निवृत्ती जाधव गुरुजी, शिवशंकर सोसायटीचे संचालक महादेवराव जाधव (सर), प्रगतशील बागायतदार धरमराज जाधव, जेष्ठ नेते जगुदादा जाधव आदी मान्यवरांनी सौ. सुवर्नाप्रभा बाळकृष्ण घोरपडे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here