महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळे वाटप

अकलूज (बारामती झटका)

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त युवासेना अकलूज शहाराच्या वतीने महात्मा फुले स्मारक भाजी मंडई, अकलूज या ठिकाणी प्रथम अभिवादन करण्यात आले. त्यावेळी युवासेना प्रमुख शेखरभैया खिलारे, राजाभाऊ खिलारे, सुरेशभाऊ गंभीरे  उपस्थित होते. तसेच युवासेनेच्या वतीने गणेशदादा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम युवासेना अकलुज शहरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा. शेखरभैय्या खिलारे, दै. सुराज्य चे जेष्ठ पत्रकार मा. प्रसाद जोगळेकर, उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक व रुग्णालयातील स्टाफ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी योद्धा प्रतिष्ठानचे जि. प्रमुख व शिवसैनिक पप्पु कुपाडे (मेंबर), बिपीन बोरावके मालक, विकी गायकवाड, चेतन खिलारे, दत्ता भोसले व कार्यकर्ते उपस्थीत होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here