माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वाढदिवसानिमित्त जनतेला आवाहन.

माळशिरस तालुक्याचे विकासरत्न विजयदादा यांना वाढदिवसानिमित्त बारामती झटका परिवार यांचेकडून लाख लाख शुभेच्छा.

अकलूज ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभेचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा 78 वा वाढदिवस दि. 12 जून 2021 रोजी असल्याने विजयदादांवर प्रेम असणाऱ्या सर्वांना आवाहन केले आहे.
आपल्या सर्वांवर सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. लाॅकडॉऊनचा काळ आहे. अशा परिस्थितीत आपण एकत्र येणे उचित नाही. त्यामुळे उद्या शनिवारी 12/6/2021 रोजी असणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही. आपण सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन करावे आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी. आपण सुरक्षित, आपले कुटुंब सुरक्षित याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. घरीच रहा सुरक्षित रहा, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा, शिंकताना, खोकताना नाक व तोंड रुमालाने झाका, मास्कचा वापर करा, आजारपण जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा, अशाप्रकारे जनतेस कोरोना कालावधीची काळजी घेण्यास दादांच्यावतीने सांगितलेले आहे.


माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील त्यांचा वसा आणि वारसा सक्षमपणे चालविणारे माळशिरस तालुक्याचे विकासप्रिय नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील उर्फ विजयदादा आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव विजयदादा लोकप्रतिनिधी असे आहेत, ज्यांनी गावच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम केलेले आहेत. लोकसभेमध्ये खासदार म्हणूनही काम केलेले आहे. विजयदादांच्या कर्तुत्वाचा राजकारणात 50 वर्षांपेक्षा ज्यादा कालावधी झालेला आहे. राजकीय कारकिर्दीत विविध खात्याच्या मंत्रिपदावर काम केलेले आहे. जास्तीत जास्त सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केलेले असल्याने विजयदादा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात एक अतूट नाते बनले होते. ग्रामीण भागात अनेक गावे एकमेकांना जोडून वाड्या-वस्त्यांवर रस्त्याचे जाळे निर्माण केले होते. ग्रामविकास खात्याचा पदभार असताना 3054 आणि 2515 योजना प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या अडचणी दूर केलेल्या होत्या. पर्यटन खात्याचा पदभार असताना महाराष्ट्रातील महापुरुष यांची जन्मस्थान आणि पर्यटन क्षेत्रे यांचा विकास केलेला होता. साखर संघाचे अध्यक्ष असताना साखर उद्योग वाढीसाठी भरीव कार्य केलेले होते. विजयदादांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत राजकारण करीत असताना माणूस हा केंद्रबिंदू म्हणून अनेक भागाचा विकास केलेला आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन काम केलेले आहे. नेहमी जनमानसात वावरणारे विजयदादांवर जनता अफाट प्रेम करते. विजयदादांना नवीन वर्ष, दिवाळी पाडवा, दसरा व वाढदिवस अशावेळी अनेक लोक शुभेच्छा देऊन दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. जनसामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य कार्यकर्तृत्व व विकासाच्या जोरावर करणाऱ्या दादांविषयी जनतेमध्ये आपुलकी व प्रेम कायम राहिलेले आहे. अनेक लोक विजयदादांना दैवत मानत आहेत. अशा माळशिरस तालुक्याचे विकासरत्न विजयदादांना वाढदिवसानिमित्त बारामती झटका परिवार यांचेकडून लाख लाख शुभेच्छा. दादासाहेब आपणास उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो, हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अकलूजचे ग्रामदैवत अकलाई मातेस साकडे. हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका परिवार मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर संपर्क 98 50 10 49 14.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here