माळशिरस तहसीलदारपदी अभिजीत पाटील यांनी पदभार स्वीकारला पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या तहसीलदार बाई माने यांची बदली झाली होती. त्यानंतर नवीन तहसीलदार म्हणुन अभिजीत सावर्डे – पाटील यांची नियुक्ती झाली. पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. तर यावेळी नुतन निवासी नायब तहसिलदार देशमुख यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
सावर्डे पाटील हे 2010 पासुन तहसील प्रशासनात सेवा करीत असून यापुर्वी त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय सेवा केली आहे. पुर्वी त्यांनी जत येथे तहसीलदार म्हणुन कार्यभार पाहीला आहे. यावेळी त्यांची बदली माळशिरस तहसीलदारपदी झाली.
तर देशमुख हे 2016 पासुन प्रशासकीय सेवेत असुन त्याची बदली माळशिरसला नायब तहसिलदार म्हणून झाली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पाटील व देशमुख यांनी तहसील कार्यालयाची पाहणी करून सर्व विभागाच्या कामकाजाची माहीती घेतली. याबाबतीत कर्मचारी व अधिकार्‍याना आवश्यक त्या सुचना दिल्या. सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस हा महसुलीसाठी मोठा तालुका म्हणुन ओळखला जातो. यात 10 मंडलानुसार कार्यभार आहे. तालुक्याची लोकसंख्या पाहता अनेक प्रकारचे दाखले, शेत शिवारातील रस्ते, खनीज उत्खनन, शेती संदर्भातील खटले, रेशनकार्ड, अलीकडे डीजीटल सातबारा प्रकारात ऑनलाईन अडचणी अशा अनेक गोष्टींचा तहसील कार्यालयाशी निकटचा सबंध येतो. त्या मुळे नव्या तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या कामकाजाकडे लक्ष लागले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की, मी नुकताच पदभार स्विकारला असुन माझा सध्या तालुक्याच्या कार्यालयाचा अभ्यास सुरु आहे. त्यानंतर तालुक्यातील इतर गोष्टीचा अभ्यास सुरु करणार आहे. महसुल च्या कामात सुसुत्रता आणली जाईल व लोकांच्या याबाबत जलद व योग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल.
नूतन तहसिलदार अभिजीत पाटील व नायब तहसिलदार देशमुख यांचा सन्मान भारत मगर, एल.डी.वाघमोडे, शौकत पठाण, संजय देशमुख, लक्ष्मीकांत कुरुडकर, श्रीनिवास कदम-पाटील, संजय हुलगे, बंडू पालवे, समाधान होळ, आदी पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here