माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विनोद बाबर,उपाध्यक्षपदी देशमुख व राऊत.

अकलुज (बारामती झटका )
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  विनोद बाबर,उपाध्यक्ष संजय देशमुख व मनोज राऊत,कार्याध्यक्षपदी एल.डी. वाघमोडे  सचिव धनंजय पवार, सहसचिव पदी विलास भोसले तर खजिनदारपदी उदय कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.
अकलुजच्या शासकीय विश्रामगृह येथे माळशिरस  तालुक्यातील पत्रकारंची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निनाद पाटील होते यावेळी जेष्ठ पञकार भारत मगर श्रीनिवास कदम पाटिल गौतम भंडारे बळीराजा संघटना अध्यक्ष अजित बोरकर विरेंद्र कुरुडकर बापुराव भोसले उपस्थित होते सर्व सभासदामधून विनोद बाबर यांची अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली तर संघटनेच्या इतर सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
माळशिरस तालुका पत्रकार संघ धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत पत्रकार संघ(एफ-३०१६६) असून  यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते .निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचा सत्कार उपस्थित सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दिनेश माने देशमुख, विजय चव्हाण,शाहरुख मुलाणी,संजय हुलगे,बंडू पालवे,जयराम घाडगे,बशीर शेख,लक्ष्मण राउत आदी सदस्य उपस्थित होते
चौकट
माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची एक नोंदणीकृत संघटना असावी असा विचार तालुक्यातील सर्व पत्रकारांनी केला त्यानुसार आज सर्वानुमते माझी बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीच्या माध्यमातून संघटनेच्या हितासाठी भविष्यात काम करणार आहे

विनोद बाबर ,
नूतन तालुका अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here