माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकरी व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे – अजित बोरकर

माळशिरस (बारामती झटका)

भारतातील शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी बिल रद्द करावे, म्हणून मंगळवार दि. 8/12/2020 रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्या बंदमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात आपला व्यवसाय बंद ठेवावा व शेतकऱ्यांच्या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी केलेले आहे.

केंद्र शासन भाजपा सरकारने शेतकरी विरोधी बिल संसदेत पास केले असून सदरचे बिल रद्द करावे या मागणीसाठी संपूर्ण भारतातून शेतकरी रस्त्यावर उतरून या बिलास विरोध करत आहेत. म्हणून आपणही शेतकरी समर्थनात आपले छोटे-मोठे व्यवसाय तालुक्यातील संपूर्णपणे बंद ठेवावे व शेतकऱ्यांच्या लढ्यात सामील व्हावे हा लढा शेतकऱ्यांचा असला तरी देशातील शोषित पिडीत, शेतमजूर, कष्टकरी यांचा आहे. देशात लोकशाही आहे, तरीही केंद्र सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या आणि लोकशाहीच्या विरोधात जाचक निर्णय घेत आहे. तरी आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सामील होणे गरजेचे आहे. हा लढा शेतकरी जाचक बिलाच्या निषेधार्थ मंगळवार दि. 8/12/2020 रोजी आपला व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शेतकरी लढ्यात सामील होऊन निषेध नोंदवा, असे माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी शेतकरी व व्यापारी यांना कळकळीचे आवाहन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here