माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील यांच्या शुभहस्ते पाझर तलावाच्या कामाचा शुभारंभ.

0

सुळेवाडी तालुका माळशिरस येथील पाझर तलावाच्या जाॅकवेल दुरुस्ती कामाचा शुभारंभ.

सुळेवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील
मौजे सुळेवाडी येथील पाझर तलावाच्या जॉकवेल दुरुस्ती कामाचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील यांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक 9 जून 20 21 रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आला. या वेळी माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागीरदार, पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, किशोर सूळ, जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सुळेवाडी सरपंच बापू करडे, उपसरपंच भीमराव फुले,जेष्ठ कार्यकर्ते कृष्णाजी सुळे, पिलीव सरपंच नितीन मोहिते, दत्तू लोखंडे, शिवाजी दडस, कबीर माने, विजय सुळे, धनाजी बोडरे, बाजीराव सुळे, विठ्ठल सुळे, मनोहर सुळे, ब्रह्मदेव बिडे, चंदू सोलनकर,संजय सुळे, प्रदीप सुळे, महादेव सोलनकर, लघु पाठबंधारे स्थापत्य अभियंता अण्णा चव्हाण, मौला मुलाणी, ग्रामसेविका शेख मॅडम व सुळेवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिलीव परिसरात ओढे-नाले बंधारे यांना ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी आलेले असल्याने पाझर तलाव व बंधाऱ्यांचे फुट फुट होऊन नुकसान झालेले होते. विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील पाझर तलाव बंधारे यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता. सुळेवाडी परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीस पाझर तलावाच्या कामाला सुरुवात माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असल्याने सुळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here