माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती यांच्या गावात पाण्यासाठी व्यक्तीचा जीव गमवावा लागला.

माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती यांच्या गावात पाण्यासाठी व्यक्तीचा जीव गमवावा लागला

बोरगाव ता. माळशिरस येथील पाण्यासाठी गेलेले अशोकराव लोखंडे यांचा पाण्यात पडल्याने मृत्यू.

पीडित व्यक्ती अशोकराव लोखंडे यांना व त्यांच्या परिवारांना न्याय मिळवून देणारा – सागर साठे

बोरगाव ( बारामती झटका )

बोरगाव माळशिरस तालुका येथे गेली दोन दिवस वॉटर सप्लाय ला पाणी नसल्यामुळे पाणी काढण्यासाठी अशोकराव लोखंडे बोरगाव येथील व्यक्ती पाण्यात पडलेला होता सदर युवकास उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारा पूर्वीच मृत्यू झालेला आहे माळशिरस पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती प्रतापराव पाटील यांच्या गावात पाण्यासाठी व्यक्तीचा मृत्यू झालेला असल्याने तालुक्यामध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.
बोरगाव गावामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लायरच्या मोटरीचा घोटाळा असल्याने दोन दिवस झाले बोरगाव मध्ये पाण्याची अडचण निर्माण झालेली होती. पाणी कुठूनही कसेतरी आणणे गरजेचे असल्याने बोरगाव येथील व्यक्ती अशोकराव लोखंडे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेले असताना पाणी काढत असताना विहिरीमध्ये तोल जाऊन पडलेले होते त्यांना पोहता येत नव्हते. दुसऱ्या व्यक्तीने विहिरीच्या बाहेर काढून पुढील उपचार करण्याकरता दवाखान्यात दाखल केलेले होते. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे.
माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील हे उपसभापती पदावर असताना गावातील दोन दिवस मोटारीचा घोटाळा निघत नसेल तर माळशिरस तालुक्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे याचाही माळशिरस पंचायत समितीच्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व्हायला हवे असेही बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका मीडिया प्रसिद्धीप्रमुख सागर साठी यांनी सांगितले
बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी दिनांक 5 जून पासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला होता… त्यामुळे संपूर्ण गावाचा पाण्याचा प्रश्न उद्भवला होता.. अशोकराव लोखंडे हे पाणी उपसा करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे विहिरी वरती गेले असता त्यांचा पाय घसरून तोल गेला व ते विहिरीमध्ये कोसळले… पोहता येत नसल्यामुळे सदर व्यक्तीला स्थानिक लोकांनी विहिरीतून बाहेर काढले व बाप्पू सकट यांनी त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेले.. सदर पीडित व्यक्ती ही मयत झाल्याचे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर समजले.. या घटनेचा शोककळा व्यक्त करत… व या घटनेचा निषेध करत…. यास जबाबदार स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन सरपंच व ग्रामसेवक यांनी राजीनामा देऊन पीडित व्यक्तीस (अशोकराव लोखंडे) न्याय द्यावा… अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका मीडिया प्रसिद्धीप्रमुख सागर साठे यांनी केलेली असून मातंग समाज संघटना आक्रमक झालेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here