युवा आ.राम सातपुते यांना अवधूत गुप्ते यांनी युवा आमदार मुलाखतीत घ्यायला पाहिजे होते.


संगमनेर (बारामती झटका)

काल अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये एक कार्यक्रम झाला. राज्यातील युवा आमदारांची मुलाखत प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी घेतली. या आमदारांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अदित्य ठाकरे, शरद पवार साहेबांचे नातू रोहित पवार, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे नातु ॠतुराज पाटील, विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख, सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आणि झिशान सिद्दीकी हे युवा आमदार होते. खरतर हे सर्व नवीन पिढीचे प्रतिनिधी आहेत. सर्वच जण खूप प्रगल्भ आणि कष्टाळू आहेत. या सर्वांना ऐकताना निश्चित महाराष्ट्राचे राजकारणात चांगल्या दिशेने जाईल अशी आशा वाटते पण या कार्यक्रमात एक खंत जाणवली ती म्हणजे या सर्वांसारखा एक आमदार या कार्यक्रमाला नव्हता तो म्हणजे राम_सातपुते, राजकारणाची कोणतीही विशेष परंपरा नसताना, आर्थिक पाठबळ नसताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, विजयी होऊन हा युवक विधानसभेत पोहचलाय. ABVP च्या माध्यमातून आंदोलने करत, लोकांच्या आरोग्याच्या अडचणीत मदत करत 30 वर्षीय रामभाऊ आमदार झाला. प्रतिकूल परिस्थितीत घराण्याचा राजकीय वारसा नसताना अशा स्वकर्तृत्वाने उदयास आलेल्या नेतृत्वाला विचार मांडण्याची संधी असती तर त्यांनाही ऐकायला महाराष्ट्राला आवडले असते पण उपस्थितांसारखी त्याची परंपरा नसल्यानेच ते तिथं दिसले नाही. संयोजकांनी किंवा कुणीही अस वगळू नये कारण जेवढं कर्तृत्व या सर्वांमध्ये आहे तेवढेच रामभाऊमध्येही आहे त्यामुळे अशा कार्यक्रमात रामभाऊ सातपुते दिसावा हिच इच्छा तमाम राम सातपुते समर्थकांमध्ये आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here