रक्तदानाच्या महायज्ञात २३७ जणांची रक्तदानरुपी आहुती

वेळापूर (बारामती झटका)

नवतरुणचा उपक्रम, पंढरपूर रक्तपेढीची साथ

दि. ७ रक्तदानाच्या महायज्ञात २३७ जणांनी रक्तदान करून रक्तदानरुपी आहुती अर्पण केली. वेळापूर, ता. माळशिरस याठिकाणी रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. येथील सामाजिक कामात अग्रेसर असलेले व आदर्श गणेशोत्सव मंडळ पुरस्काराने सन्मानित झालेले श्री नवतरुण गणेशोत्सव मंडळाने पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. उन्हाळ्यात रक्तपेढीमध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा व वाढत्या रहदारीमुळे होणारे अपघात लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. ०५ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळात रक्तदान शिबिर व्यापारी पेठेमध्ये पार पडले. प्रारंभी श्री गणेशाचे पूजन डॉ. संजय आडत, धनंजय पवार, शहाजी गायकवाड,  दत्तात्रय गाढवे, गजानन गाढवे, साधू पिसे, बजरंग कानगे, दत्तात्रय काटे, भैय्या खोरे,  उमेश होनमाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढवून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या शिबिरात तुरळक प्रमाणात उपलब्ध असणारे रक्तगट रक्तपेढीला मिळाले. वेळेअभावी हे शिबीर संध्याकाळी साडेसात वाजता थांबवावे लागले. शिबिर यशस्वी करण्यासाठी नवतरुण गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी  पंढरपूर ब्लड बँकेचे डॉ. प्रसाद खादिलकर, सागर जाधव, महेश हाके, प्रशांत पवार, औदुंबर नरोटे, रामदास रुपनवर, रेखा चव्हाण, रोहिणी कांबळे, ज्योती उपाध्ये, स्वराली उपाध्ये आदींनी विशेष परिश्रम घेतले.

रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर

कशाचेही औचित्य न साधता आयोजित केलेले हे शिबीर वेळापूर व पंचक्रोशीतील रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर झाले. यामध्ये २३७ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून सहकार्य केले. तर महिलांनीही या शिबिराला मोठी उपस्थिती दर्शवत रक्तदान केले.

रक्तदात्याना सुरक्षित हेल्मेट भेट

या शिबिरात रक्तदात्यांना मंडळाकडून सुरक्षित भेट म्हणून हेल्मेट भेट देण्यात आले. वाढते अपघात लक्षात घेऊन ही महत्वाची भेट असल्याचे यावेळी रक्तदात्यांनी सांगितले.

कोट : गरजूंना रक्त उपलब्ध व्हावी ही भावना !

उन्हाळ्यात मोठे अपघात होतात. यामध्ये अनेकांना रक्ताची गरज भासते. तर रक्तपेढीनमध्ये रक्ताची कमतरता जाणवते. यामुळे गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे, ही आमची भावना आहे. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here