रांगड्या सातारकरांचा भन्नाट लॉकडाऊन – मनोरंजन विशेष ब्लॉग

सातारा (बारामती झटका)

जवळजवळ गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊन विथ सातारकर हा RJ सोनल मॅडम संचलित कार्यक्रम मी फेसबुक सातारा या माझ्या सर्वात आवडत्या फेसबुक ग्रुपवर पाहत आहे. सह्याद्रीच्या कडेपठारातून ‌‌‌‌‌‌‌‌‌उसळलेल्या अबलक घोड्यांच्या टापांनी दिल्लीचेही तख्त राखत आसेतू हिमाचल हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारी राजधानी साताराची पुण्यभूमी आणि त्या भूमीतून दररोज भेटीला येणाऱ्या या विशेष कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, अतिशय वेगळ्या स्वरूपात, हटके रंगा-ढंगात याची बांधणी करण्यात आली आहे. कानाने ऐकायचा रेडिओ इथं उघड्या डोळ्यांनी पाहताना मनपटलाला भुरळ घालून आनंद देऊन जातो. कारण पूर्वी आकाशवाणी वरती जश्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या मुलाखती घेतल्या जायच्या तश्याच दिलखुलास मुलाखती इथंही without कमर्शिअल ब्रेक पहायला मिळतात. सोबतीला साताऱ्या विषयी ऐतिहासिक, सामाजिक आणि भौगोलिक रोचक माहिती आपल्या सामान्य ज्ञानात भर टाकत जाते आणि यात असलेल्या सांगीतिक गप्पा या कार्यक्रमाला मनस्वी आपलेपणा देऊन जातात. जुन्या आठवणी आणि कोंदटलेल्या मनात जपून ठेवलेले काही क्षण प्रत्येक माणसाला भूतकाळात अलगदपणे हरवायला घेवून जातात, आपल्या मातीची माणसांची ओढ हा कार्यक्रम पाहताना लागल्याशिवाय राहत नाही.

90 च्या दशकात आकाशवाणीच्या विविध भारती या चॅनेल वरती आपकी फर्माईश हा युनूस खान ने अजरामर केलेला कार्यक्रम असो त्याचबरोबर सखी सहेली हा ममता सिंह यांनी यशाच्या शिखरावर घेऊन गेलेला कार्यक्रम असो त्याकाळी लहानपणी मनोरंजनासाठी दुसरा पर्याय नसल्याने मी रेडिओवर टाईमपास म्हणून हे कार्यक्रम तासंतास ऐकत राहायचो. पण गेल्या 2 महिन्यांपासून त्या बालपणीच्या सर्व जुन्या आठवणी पुन्हा अचानक लॉकडाऊन with सातारकर.. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे नव्याने ताज्या झाल्या. RJ सोनल मॅडम आणि त्यांचा आवाज, बोलण्याची खास शैली, सादर करण्याची पद्धत अगदी तंतोतंत सखी सहेली या कार्यक्रमाची आणि ममता सिंग यांच्या आवाजाची आठवण करून देतात. सोनाली हेंद्रे-कुमठेकर मॅडम आकाशवाणी च्या सातारा केंद्रावर येतात हे सर्व सातारकर मंडळींना माहीत असेलच. आजच्या जगभर लागू असलेल्या कोरोना च्या संकटकालीन लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्यांच्या या कार्यक्रमामुळे आमचा दररोज एक तास इतका वेगवान होऊन जातो की, वाटतं आता उद्या सायंकाळच्या 6 ची वाट पाहत बसावी लागणार आणि नमस्कार सातारकर.. कसे आहात सगळे.. हे वाक्य कधी कानी पडणार.. सातारी पाट्या, कोडी तर लयच भारी.. सगळं काही अफलातून..

कालच्या कार्यक्रमात काही तांत्रिक अडचणींमुळे आमंत्रित सेलेब्रिटी स्मिता देशमुख यांच्याशी संवाद साधता आला नाही परंतु तरीही या कार्यक्रमाचे दिग्दर्शक, फेसबुक सातारा चे संस्थापक आमचे मित्र डॉ. अजय वाडते सर यांच्याशी अनाहूतपणे मनमुराद गप्पा झाल्या हाच आनंद सर्वांना द्विगुणित करून गेला. अजय सरांना मी पहिल्यांदा “गाव लय झाक” या त्यांनीच निर्मित केलेल्या वेबसिरिज मध्ये पाहिले होते. खरंतर त्यांची त्यात असणारी व्यक्तीरेखा इतकी भन्नाट होती की त्यांच्यावर हसू ही यायचं आणि काही प्रसंगी कीव ही करू वाटायची. आज त्यांना त्याच सिरीजवर बोलतं करता आलं, त्यांचे अनुभव जाणून घेता आले ही गोष्ट माझ्यासाठी दुग्धशर्करा योग होता. फेसबुक|सातारा वयक्तिक माझ्यासाठी खूप मोठं विचारपीठ आहे, इथं आल्यापासून मला एक वेगळी ओळख मिळाली आहे. साडे पाच लाख सदस्यांचा हा खूप मोठा परिवार आहे आणि माझं हे भाग्य आहे की मी ही या अजस्त्र परिवाराचा एक घटक आहे. गेल्या 1 वर्षभरापासून मी या व्यासपीठावर लिखाण करत आहे, अत्यंत वैचारिक आदानप्रदान करणारी अनेक नामवंत व दिग्गज मंडळी या परिवाराशी जोडली गेली आहेत.

फेसबुक|सातारा या व्यासपीठावर लिखाण करतोय तेव्हापासून मलाही अनेक क्षेत्रातील नामांकित लोकांचे, जगाच्या पाठीवर जिथं जिथं सातारकर मराठी आहेत तिथून फोन येतात, कौतुक होतं तेव्हा वाटतं की खरच आपण इथं काहीतरी वेगळं मिळवत आहोत. या परिवाराशी जोडल्या गेल्यापासून फेसबुकच्या या आभासी दुनियेतही अनेक चांगली माणसे, मित्र, हितचिंतक भेटले आहेत. याचं सर्व श्रेय संपूर्ण फेसबुक|सातारा टीम आणि डॉ. अजय वाडते सर, रोहित देशमुख सर यांचं आहे, मी त्यांना अनेकदा तसं म्हटलं ही पण अजय सर नेहमी म्हणतात, “तुम्ही तुमच्या अंगातील कलेने जे काही आहे ते मिळवले आहे, टॅलेंट 100% तुमचं आहे, आम्ही तर फक्त एक माध्यम आहोत”. खरच अजय सर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण एवढं मोठं माध्यम कोणतीही अपेक्षा न ठेवता उपलब्ध करून देणे त्यासाठी ही खूप मोठं आणि दर्यादिल असणारं निस्वार्थी मन लागते. शब्दात धन्यवाद आणि आभार मानणे खूपच तोकडे होईल पण आयुष्यात जेव्हा कधी या फेसबुक सातारा परिवारासाठी काहीतरी करण्याचं भाग्य मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या मनाचं समाधान होईल. खूप विस्तृतपणे आणि वारंवार लिहीत राहायचं आहे पण आज तूर्त इतकेच..

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here