लोकनेते पै. दत्ताआप्पा वाघमारे यांच्या स्मरणार्थ कोरोना विरोधात लढणाऱ्या देवदूतांची सेवा.


माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य शिवनेरी तालीम अकलूजचे संस्थापक लोकनेते पैलवान स्वर्गीय दत्ता आप्पा वाघमारे यांच्या स्मरणार्थ कोरोना विषारी विषाणूच्या महामारी पासून जनतेची ची सुटका करण्याकरता जनतेची अहोरात्र सेवा करणारे संकटकाळी उत्तम सेवा देणाऱ्या देव-दुतांची छोटीशी सेवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत जनता कर्फ्यू असताना जनतेची सेवा करीत असताना आपले कर्तव्य बजावणारे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी चौकाचौकांमध्ये अहोरात्र उभे राहून कर्तव्य व्यक्त करणारे, प्रांत कार्यालय ,तहसील कार्यालय, रेशन दुकानदार, गॅस ऑफिस, विविध बँका, उपविभागीय पोलीस कार्यालय, माळशिरस नातेपुते अकलूज वेळापूर पोलीस स्टेशन कार्यालय, पत्रकार बांधव अशा सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना लिक्विड हँड सॅनेटायझरचे वाटप युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्नीलभैया वाघमारे व पंचायत समिती सदस्या सौ, प्राजक्ता स्वप्निल वाघमारे यांच्यावतीने वाटप करण्यात आले.


लोकनेते स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांनीही ही आपल्या राजकीय कारकीर्दीत व माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख असताना सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी भरीव असे कार्य केलेले आहे दत्ताआप्पा यांचा अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना मदत करणे हा हा चांगला गुण असल्याने दत्ताआप्पा यांच्या पश्चात एक था टायगर असे सर्वसामान्य व पीडित व्यक्तींच्या मधून बोलले जात आहे स्वर्गीय लोकनेते दत्ताआप्पा वाघमारे यांचा वसा आणि वारसा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भैया दत्तात्रय वाघमारे यांनी चालविलेला आहे.


सध्या देशात व राज्यात कोरोना या विषारी विषाणूने थैमान घातलेले आहे महामारी पासून जनतेची सुटका व्हावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत सर्व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग साफ सफाई कर्मचारी हेसुद्धा जिद्दीने कोरोना शी लढाई लढत आहेत मदत म्हणून नव्हे हे तर कर्तव्य म्हणून सर्वांना फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही लिक्विड हँड सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले असल्याचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नीलभैया वाघमारे यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here