विठ्ठलवाडी गाव उपळाई बुद्रुक येथील बँकेऐवजी माढ्यातील राष्ट्रीयीकृत बँकेस जोडावे

ग्रामपंचायतीने रितसर ठराव करुन तहसीलदारांना दिले निवेदन

माढा (बारामती झटका राजेंद्र गुंड यांजकडून)

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी हे गाव सध्या उपळाई बुद्रुक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेस दत्तक गाव म्हणून जोडले आहे परंतु हे गाव आणि बँक खातेदारांना अत्यंत गैरसोयीचे ठरत असल्याने खातेदार व ग्रामपंचायतीच्या वतीने रितसर ठराव संमत करून माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे माढा शहरातील कोणत्याही एका राष्ट्रीयीकृत बँकेस विठ्ठलवाडी दत्तक गाव म्हणून जोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.खातेदारांनी सह्या केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,उपळाई बुद्रुक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून आम्हाला पीक व वैयक्तिक कर्ज तसेच महिला बचत गट आणि व्यावसायिक कर्ज मिळत नाही. सतत विनाकारण हेलपाटे मारावे लागतात. विशेषत: महिला खातेदारांची मोठी गैरसोय व कुचंबना होत आहे.या गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही तसेच थेट जाणारे खाजगी अगर शासकीय वाहतूक सुविधा नाही त्यामुळे जास्त अंतरावरून माढा मार्गे जावे लागते त्यामुळे खातेदारांना व महिलांना सोईचे असणा-या माढा शहरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेस विठ्ठलवाडी दत्तक गाव म्हणून जोडण्याची विनंती केली आहे.निवेदनावर मोठ्या संख्येने खातेदारांनी सह्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठवली आहे.

याप्रसंगी विठ्ठलवाडीचे सरपंच अरुण कदम, वाचनालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड,रोहिदास शिंगाडे,जयराम भिसे, नेताजी खैरे,बालाजी कदम, सतीश गुंड,रमेश बरकडे,श्रीमंत शिंगाडे, सौदागर गव्हाणे यांच्यासह ग्रामस्थ व खातेदार उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here