वितरीका क्र.१३ वरील पोटचारी काढून द्या- शेतकऱ्यांची मागणी


वेळापुर (बारामती झटका)

अकलूज येथील उपविभागीय दंडाधिकारी अकलूज विभाग यांना लेखी निवेदण देण्यात आले, की आम्ही कारणे विनंती अर्ज सादर करितो,की आम्ही सर्वजण खालीलप्रमाणे सह्या करणारे मु.पो.उघडेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील कायमचे रहिवाशी असुन आमचे येथुन सन १९४० पासून वितरीका क्र.१३ (नळी) वरील पोटचारी चालु होती.तसेच अंदाजे सदर चारीवरती ३० ते ३५ एकर क्षेत्र ओलिताखाली येत होते.सदर पैकी १-६० हे क्षेत्र हे ब्लॉकसाठी कायम स्वरूपी सिंचीत करण्यात आले होते.परंतु दि.१९ /०४/२०२० रोजी पासून १)श्री.विलास रामहरी पिसे २)श्री.नानासाहेब रामहरी पिसे ३)श्री.विठू रामहरी पिसे आणि इतर चारजण यांनी मिळून वितरीका क्र.१३ पोटचारी ट्रॅक्टर लावून बुजवून टाकली आहे. दावने भाऊसो यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही आरेरावीची भाषा वापरून त्यांना न जुमानता वितरीका क्र. १३ वरील पोटचारी ट्रॅक्टरने बुजवून टाकली आहे.
सदर वितरीका क्र.१३ पोटचारी बुजविल्याने शेतकऱ्यांचे जळून पीक खाक होत आहे तरी शेतकऱ्यांचे नुसकान भरपाई मिळावी.तसेच वितरिका क्र. १३ पोटचारी काढून मिळावी तसे न झाल्यास येथुन पुढील काळात पाटबंधारे शाखा वेळापूर कार्यालयसमोर बेमुदत उपोषण अथवा आत्मदहन करण्यात येईल.असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे.अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्हा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री,(महाराष्ट्र राज्य),पाटबंधारे व जलसंधारण मंत्री(महाराष्ट्र राज्य) जयंत पाटील,माढा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज शमा पवार,माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते सातपुते,निरा उजवा कालवा विभाग वेळापूर शाखा अभियंता दीनेश राऊत,वेळापुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना देण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here