वेळापूरात यल्लमादेवी यात्रेत ह.भ.प. इंदुरीकरांचे समाज प्रबोधन

यल्लमा देवी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेळापूर (बारामती झटका)
शेरी-वेळापूर ता. माळशिरस येथील श्री यल्लमा देवी यात्रेनिमित्त रविवार दि. २२ डिसेंबर २०१९ ते दि. २८ डिसेंबर २०१९ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असल्याची माहिती श्री यल्लमा देवीचे मानकरी जगन्नाथ माने-देशमुख व विनायकराव माने-देशमुख यांनी दिली.
दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी गादीचे मालक जगन्नाथ माने-देशमुख यांचे घरून यल्लमा देवीची पालखी बाजरीची भाकरी, सर्व भाज्या, गऱ्याची वडी, थालीपीठ असा नैवेद्य घेवून मंदिराकडे निघते. पालखीचे खांदेकरी शिंदे व पांढरे परिवार ही पालखी घेवून मंदिरात येतात. दिवाबत्तीचा मान साठे परिवाराकडे असतो. मंदिरामध्ये पालखी आल्यानंतर विनायकराव माने-देशमुख यांचे हस्ते नैवेद्य दाखवून यात्रेची सुरूवात करण्यात येते. दि. २३ रोजी सकाळी देवीची विधीवत पूजा होवून आरती होते. त्यानंतर दिवसभर देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो. सायंकाळी ७ वाजता ललकार कोल्हापूर यांचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता संभाजीराव माने देशमुख यांच्या वाड्यातून पंचांचा मानाचा आहेर देवीला करण्यात येतो. दि. २४ रोजी सकाळी पालखी साडी, चोळीसाठी शेरी ते वेळापूर येथे जाते. श्री अर्धनारी नटेश्वर व कुंडाची भेट घेवून पालखी शेरी येथे येते. याठिकाणी होमाचा कार्यक्रम होतो. दि. २५ रोजी होमपूजा करून यात्रेची सांगता करण्‍यात येते. दि. २८ रोजी सायंकाळी ४. वाजता समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे समाजप्रबोधनपर किर्तन श्री शामलक्ष्मी शेती फार्म हाऊस डी ४,१२ फाटा वेळापूर-शेरी येथे होणार असून या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.


ही यात्रा यशस्वी करण्यासाठी अमरसिंह माने-देशमुख, कमलाकर माने-देशमुख, आनंदराव माने-देशमुख, बाळासाहेब माने-देशमुख, धैर्यशील माने-देशमुख, शहाजीराव शिर्के, सुधीर माने-देशमुख, शिवाजी माने-देशमुख, दत्तात्रय शिंदे, हणुमंत कदम, बाळासाहेब साठे, महादेव आडत, अंबादास शेंडगे व वेळापूर शेरी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

नवनवीन व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here