शनिवारी निमगाव मध्ये रंगणार वावडी महोत्सव

निमगाव(बारामती झटका)
निमगाव ता माळशिरस येथे शनिवार दिनांक 10 /8/ 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता निमगाव पिलीव रोड नजीक नंदोबा मंदिराच्या पाठीमागे स्पर्धात्मक स्वरूपात वावडी महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती या महोत्सवाचे आयोजक निनाद पाटील यांनी दिली
सन 2018 पासून हा वावडी महोत्सव सुरू केला असून या वर्षी या महोत्सवाचे दुसरे वर्ष असून यावेळी मात्र स्पर्धात्मक स्वरूपात या ठिकाणी वावड्या आकाशात उडणार आहेत ही स्पर्धा चार गटात विभागली असून पहिल्या गटात पाच फुटाच्या आतील वावड्या असून यामध्ये चार बक्षिसे दिली जाणार आहेत ही सर्व बक्षिसे हनुमंत विलास जगताप यांच्यामार्फत दिली जाणार आहेत
दुसऱ्या गटात आठ फुटापर्यंत वावडी असून याही गटात चार बक्षिसे दिली जाणार असून ही बक्षिसे विशाल सेवा कृषी केंद्र लवंग, विशाल केचे पाटील यांच्यामार्फत या गटातील चारही बक्षिसे दिली जाणार आहेत. 12 फुटापर्यंत चा तिसरा गट केला असून या तिसर्‍या गटात ही चार बक्षिसे दिली जाणार आहेत ही बक्षिसे ऍड जीपी कदम, ऍड चंद्रशेखर मगर ,ऍड अजित काटकर, ऍड सागर जाधव यांच्या मार्फत दिली जाणार आहेत बारा फुटावरील वावडी हा शेवटचा गट असून या गटामध्ये बारा फूट उंची पेक्षा जास्त असणारी वावडी व इतर वावडी प्रकार उदाहरणार्थ बुवा, विमान, चांदणी अशा वावड्या या गटात ग्राह्य धरल्या जाणार असून याही गटात चार बक्षिसे दिली जाणार आहेत या गटातील चारही बक्षिसे निमगाव चे उपसरपंच नंदकुमार पाटील व हनुमंतराव साहेबराव मगर यांच्यामार्फत दिली जाणार आहेत


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी शनिवार दि 10 रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत आपल्या वावडीची नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी केलेल्या वावड्याच याठिकाणी स्पर्धात्मक स्वरूपात उडवल्या जाणार आहेत याच ठिकाणी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असेही आवाहन करण्यात आले आहे
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. संपादक श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14 व 9130103214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here